मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल 35 मिनिटे चर्चा झाली. एकत्र येत आपल्यासोबत यावे, तसेच केंद्रातील भाजपासोबत हातमिळवणी करुन आपण सत्तेत सहभागी व्हावे, यासह इतर प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ठेवण्यात आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी प्रस्ताव फेटाळले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जयंत पाटील हे शरद पवारांच्यासोबत राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
किमान सुप्रिया सुळे यांच्यासह इतर आमदार-खासदारांना पाठवा, अशी अजित पवार यांनी विनंती केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये लवकरच आणखी एका बैठकीची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे. या दोघांच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळातून अनेक तर्क काढले जात आहेत. या दोघांच्या बैठकीनंतर राजकीय नेते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या अशा भेटीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दानवे म्हणाले आहेत.
-
अजित पवार गटाची सद्यस्थिती अशी आहे का?.....🤔 pic.twitter.com/3NBm3IJNxK
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">अजित पवार गटाची सद्यस्थिती अशी आहे का?.....🤔 pic.twitter.com/3NBm3IJNxK
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 13, 2023अजित पवार गटाची सद्यस्थिती अशी आहे का?.....🤔 pic.twitter.com/3NBm3IJNxK
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 13, 2023
संभ्रम दूर करावा : अंबादास दानवे म्हणाले की, शरद पवार व अजित पवार यांची भेट झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली. दरम्यान यापूर्वीही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे की, भाजपासोबत ते जाणार नाहीत. परंतु अशा भेटींमुळे जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, त्यामुळे अशा गोष्टींची स्पष्टता समोर आली पाहिजे. अशा पद्धतीने खासगीमध्ये बोलले जात आहे. भेटीमुळे निर्माण झालेल्या संभ्रम आपण नाकारू शकत नसल्याचे दानवे यांनी आपल्या प्रतिक्रिया म्हटले आहे.
कौटुंबिक भेट होती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यातील कौटुंबिक भेट होती. त्यामुळे त्याला इतके राजकीय भेट म्हणणे चुकीचे ठरेल. कौटुंबिक काही गोष्टींसाठी ते भेटले असतील असे मत काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक व्हिडिओ ट्विट केले आहे. यामध्ये अभिनेते कादर खान आणि जॉनी लिव्हर यांचा संभाषण दाखवण्यात आला आहे. या माध्यमातून सचिन सावंत यांनी एक इशारा दिला आहे. अजित पवार गटाची सद्यस्थिती अशी आहे का? असा सवाल त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवार गटाला विचारला आहे.
काँग्रेसचा आरोप: ज्याप्रकारे महाविकास आघाडी सरकारला पायउतार करण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर केल्याचा आरोप वारंवार महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून केला जातो. याच केंद्रीय एजन्सीचा वापर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्यासाठी केला गेला असा, आरोप आता काँग्रेस आणि शिवसेनेकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आली आहे. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ही ईडी कारवाईच्या संदर्भात झाली असल्याचे बोलले जात आहे.
एकाच मंचावर शरद पवार आणि फडणवीस : शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते आयटी पार्कच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहेत. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे तथा माजी मंत्री दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण आणि महाविद्यालय नामांतर सोहळा सांगोला येथे होणार आहे. दोन्ही सोहळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहेत. पवार आणि फडणवीस आज एका मंचावर येत असल्याने कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-