मुंबई: अनुप डांगे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti-Corruption Bureau, Mumbai) चौकशी करिता हजर राहण्यासाठी समन्स पाठवले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीला आलेल्या परमबीर सिंग यांनी हे आरोप निराधार (Allegations made by Anup Dange are baseless) असल्याचे सांगत लाच घेतलेली नाही असे सांगितले आहे.
परमबीर सिंह यांच्यावर अनुप डांगे प्रकरणात भ्रष्ठाचाराचे आरोप आहेत. याप्रकरणी त्यांना 11 जानेवारी रोजी समन्स पाठवून चौकशी करता हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतू कोविडच्या प्रादुर्भावाचे कारण देत त्यांनी वकिलांमार्फत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्र व्यवहार करून दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला होता. 27 जानेवारी रोजी पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमवीर सिंग यांना समन्स पाठवण्यात आले त्यानुसार ते आज उपस्थित राहिले.
वर्षभर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र त्यात काही निकाल न लागल्यामुळे अनुप डांगे यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी गेल्यावर्षी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. याप्रकरणात वर्षभरानंतरही कोणतीही प्रगती न झाल्यामुळे डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. डिसेंबरमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे यांना डांगे यांनी पत्र लिहून हे प्रकरण सीबीआय वर्ग करण्याची मागणी केली. या प्रकरणात सीबीआय अनुप डांगे यांचा जवाब नोंदवला आहे.
या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक असलेल्या परमबीर सिंग यांनी यांनी याप्रकरणी कोणताही संबंध नसतानाही त्यांना एसीबी कार्यालयात बोलावले होते. तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी तेथे जाण्याची परवानगी दिली नाही. फेब्रुवारी 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. सिंह यांच्या अंडरवर्ल्डसोबत संबंधांबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. 2 फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आलेल्या या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. त्याबाबत नाराजी व्यक्त करत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे.