ETV Bharat / state

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे सुरू होणार

16 नोव्हेंबरला (सोमवार) दिवाळीच्या पाडव्यापासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाबाबतची खबरदारी भाविकांनी प्रार्थनास्थळांवर घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Nov 14, 2020, 3:40 PM IST

Updated : Nov 14, 2020, 4:23 PM IST

मुंबई - राज्यातील सर्वधर्मीयांची मंदिरे, प्रार्थनास्थळे भाविकांसाठी पुन्हा खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. 16 नोव्हेंबरला (सोमवार) दिवाळीच्या पाडव्यापासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाबाबतची पूर्ण खबरदारी भाविकांनी प्रार्थनास्थळांवर घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतरही राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनलॉकमध्ये बहुतेक सर्वच बाबी सुरू झाल्याने राज्यातील मंदिरेही खुली करावीत, अशी मागणी भाजपसह काही संस्था, संघटना सातत्याने करत होत्या. याची दखल घेत अखेर ठाकरे सरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वच व्यवहार बंद करण्यात आले होते. मिशन बिगीन अंतर्गत सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले जात असताना मंदिरे कधी उघडणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. दिवाळीनंतर मंदिरे उघडली जातील, असे संकेत मुख्यमंत्र्यानी दिले होते. आता पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरू नका

यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासूर वधही झाला. नरकासूररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छा -

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.

शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद -

हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!

Last Updated : Nov 14, 2020, 4:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.