ETV Bharat / state

भाजप नावाचे संकट दूर करायचे असेल तर ममता बॅनर्जींच्या पत्राचा विचार करावा -संजय राऊत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पत्रावर सर्व विरोधी पक्षांनी विचार करावा. सर्वांनी एकत्र येऊन पुढील दिशा ठरवावी, असे खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे.

संजय राऊत
sanjay raut
author img

By

Published : Apr 2, 2021, 1:34 PM IST

Updated : Apr 2, 2021, 1:41 PM IST

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे त्यांनी पत्र लिहिले आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी आपली भूमिका मांडली. "ममता बॅनर्जींनी दिलेल्या पत्रावर भाजपच्या सर्व विरोधी राजकीय पक्षांनी विचार करायला पाहिजे. सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी एकत्र येऊन पुढली दिशा ठरविली पाहिजे. त्याशिवाय ममता बॅनर्जी जे म्हणतात ते संकट दूर होणार नाही", असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

'ममता बॅनर्जींच्या पत्रावर सर्वांनी विचार करण्याची गरज'

"दुर्दैवाने आज कोणी जयप्रकाश नारायण नाही"

1975 नंतर जेव्हा आणीबाणीच्या काळात सर्व एकत्र आले होते. त्यांना एकत्र करण्याचं काम जयप्रकाश नारायण यांनी केलं होतं. दुर्दैवाने आज कोणी जयप्रकाश नारायण नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना हे तीन भिन्न विचारांचे पक्ष गेल्या वर्षापासून सरकार चालवत आहेत. हे एक आदर्श सरकार आहे. अशा प्रकारची आघाडी ही युपीएच्या माध्यमातून एकत्र व्हावी. ममता बॅनर्जींनी त्यांच्या पत्रातून त्याच प्रकारच्या सूचना केल्या आहेत, असेही संजय राऊतांनी म्हटले.

ममता बॅनर्जींनी काय म्हटले आहे पत्रात?

विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनिती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी ममता बॅनर्जींनी पत्रातून सूचवले आहे. पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. तसेच, देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे, असे या पत्रात म्हटले आहे.

पुढील दोन महिन्यात अनेक राज्यात निवडणुका आहेत. निवडणूक आयोगाला ही बटीक बनवून देशात स्वतःचे राज्य यावं यासाठी भाजपा तयारी करताना दिसत आहे. यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री देखील दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर देखील या निवडणुकांमध्ये केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. भाजपा ज्याप्रकारे संविधानाचा गैरवापर करून देशातील नागरिकांना कमकुवत करत आहे. याची सुरुवात 8 नोव्हेंबर 2016साली नोटा बंदीचा निर्णय घेऊन झाली. दिल्लीत भाजपाला धूळ चारून आम आदमी पार्टी सत्तेत आली. तिथे सर्व अधिकार काढून ते अधिकार उपराज्यपालांना देण्यात आलेले आहे. लोकशाही संपवण्याचा भाजपाचा घाट आहे, असे या तीन पानी पत्रात ममता बॅनर्जींनी लिहिलेले आहे.

लसीकरणावरून राऊतांचा मोदींवर निशाणा

लसीकरणावरून मोदींवर निशाना

संजय राऊतांनी महाराष्ट्रासह भारतातील लसीकरणासंदर्भात आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने महाराष्ट्राकडे अत्यंत काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. केवळ बंगालच्या किंवा इतर चार राज्यातील निवडणुकांकडे लक्ष न देता इतर राज्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलवून सोडवाव्यात', असे राऊतांनी म्हटले.

हेही वाचा - नाशिक जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही; पालकमंत्री छगन भुजबळांनी केले स्पष्ट

हेही वाचा - दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन पाजले विष; पीडितेचा मृत्यू

Last Updated : Apr 2, 2021, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.