ETV Bharat / state

थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी - thodkayt important

राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

all-news-from-maharashtra
थोडक्यात महत्त्वाचे : महाराष्ट्रातील घडामोडी
author img

By

Published : Jul 28, 2020, 5:02 PM IST

Updated : Jul 28, 2020, 10:18 PM IST

राज्यातील संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात...

  • करमाळा (सोलापूर) : सोलापूर-पुणे लोहमार्गावरील रेल्वेचे विद्युतीकर काम वेगाने सुरू आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्हयातील भिगवण ते करमाळा तालुक्यातील वाशिंबे दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील करमाळा तालुक्यातील जिंती,पारेवाडी, वाशिंबे ३५ किमी. दरम्यान रेल्वे विद्युतीकरण चाचणी घेण्यात आली. ती यशस्वीरीत्या पार पडली. कोरोनाच्या संकटातही रेल्वेचे दुहेरीकरण विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.
  • पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना वाढता प्रादुर्भाव आहे. या परिस्थितीत उपचार घेण्यासाठी महिला, तरुणींना मनपा रुग्णालय किंवा कोविड सेंटरमध्ये दाखल केले जाते. अशा वेळी महिला आणि तरुणींना मासिक पाळी आल्यानंतर अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. हीच समस्या ओळखून येथील एका संस्थेने आकुर्डी येथील या महिलांना सेनेटरी पॅड, फेस मास्क, फेश शिल्ड, डॉक्टरांना पीपीई किटचे मोफत वाटप केले आहे. 'मानवता हिताय' असे या सामाजिक संस्थेचे नाव आहे.
  • पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत ११४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असून ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार २५ इतकी झाली असून, ४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २ हजार २५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७३० कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • परभणी : गेल्या काही दिवसात नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत चालली होती; मात्र आज (मंगळवारी) अचानक पुन्हा त्यात वाढ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात 30 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 562 वर जाऊन पोहचली आहे तर आतापर्यंत 25 जणांचे बळी गेले आहेत. सध्य परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या संक्रमित कक्षात 274 सक्रिय कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यादरम्यान समाधानाची बाब म्हणजे आज परभणी जिल्ह्यातील 11 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 205 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. तसेच, 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 हजार 32 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी आढळलेले 205 रुग्ण लक्षात घेतले असता सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10 हजार 249 इतकी झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे, जिल्ह्यातील 6 हजार 736 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मंगळवारी 231 जणांना कोरोनातून बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला.
  • नागपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे, मंगळवारी एकाच दिवसात तब्बल १५१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४,४८७ इतकी झाली आहे. तर आज १०२ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २,६८५ इतकी झाली आहे. या शिवाय आज ८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपूरात एकूण ९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
  • रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या 24 तासांत आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 57 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासात प्राप्त अहवालामध्ये जिल्ह्यात 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,661 झाली आहे. दरम्यान 48 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,102 झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 502 एवढे आहेत.
  • यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज पुन्हा 40 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर 16 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 852 झाली आहे. यापैकी 502 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 26 मृत्यूंची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे.
  • नांदेड : जिल्हयासाठी मंगळवार अमंगळ ठरला असून कोरोनाच्या मृत्यू व रुग्ण संख्येने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. गत तासात 10 जणांचा मृत्यू तर 134 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने एक हजार 528 आकडा पार केला आहे. तसेच, आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 70 झाली आहे. जिल्हयात 677 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून त्यातील 11 रुग्ण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. तसेच 30 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
  • वर्धा : आज नोंद झालेल्या १३ कोरोना रुग्णांनंतर, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 161 वर पोहचली आहे. तसेच आज एकूण १५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 103 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 53 झाली आहे. जिल्ह्यातील आर्वी शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता 30 जुलै पर्यंत शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
  • शिर्डी (अहमदनगर) : शहरात मागील 15 दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात सहा नवीन रुग्णांची भर पडल्याचे शिर्डी नगरपंचायतचे नोडल आधिकारी मुरलीधर देसले यांनी सांगितले. यात दोन माजी उपनगराध्यक्ष बाधित आढळून आले असून शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 104 वर पोहचली आहे.
  • वसई (पालघर) : संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. मंगळवारी वसई-विरारमध्ये 95 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिवसभरात उपचारादरम्यान 06 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, 105 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 11 हजार 468 वर पोहोचली आहे. तसेच, आतापर्यंत एकूण 238 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर आतापर्यंत 7 हजार 513 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 हजार 717 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Last Updated : Jul 28, 2020, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.