ETV Bharat / state

Pune ISIS Module : पुण्यातील दहशतवाद्यांचे इसिसशी कनेक्शन,  'ही' संघटना कशी काम करते? - Al Sufa Terrorist Organization

'लष्कर ए तोयबा' आणि 'इसिस'सारख्या अनेक दहशतवादी संघटनांचे नाव आपण ऐकले आहे. पण पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून पाच जणांना अटक केल्यानंतर अल-सुफा ही दहशतवाद संघटना डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. अल-सुफा ही दहशतवादी संघटना इसिसचाच एक भाग आहे. ही दहशतवादी संघटना भारतीय स्वरूप असल्याची माहिती ज्येष्ठ क्राईम रिपोर्टर विवेक अगरवाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Al Sufa terrorist organization
अल सुफा दहशतवादी संघटना
author img

By

Published : Jul 31, 2023, 7:01 AM IST

Updated : Jul 31, 2023, 7:19 AM IST

जेष्ठ पत्रकार विवेक अगरवाल यांची प्रतिक्रिया

मुंबई : अल-सुफा ही कट्टरतावादी विचारसरणी असलेली दहशतवादी संघटना आहे. यात सुमारे 50 ते 70 तरुणांचा समावेश आहे. हे तरुण दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलसारखे काम करतात. अल-सुफा कट्टर इस्लामिक विचारधारा आणि पद्धतींनी प्रेरित आहे. ही संघटना मुस्लिम समाजातील विवाहासारख्या कार्यक्रमांच्या विरोधात आहे. गेल्या 20 वर्षांपासून सक्रिय असलेली ही दहशतवादी संघटना भारतात मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात देखील स्लीपर सेलच्या माध्यमातून सक्रिय आहे. एनआयए, मध्य प्रदेश एटीएस, राजस्थान एटीएस आणि महाराष्ट्र एटीएस या संघटनेवर नजर ठेवून आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार विवेक अगरवाल यांनी दिली आहे.

धर्माकडे दिशाभूल करण्याचे काम : रतलाममध्ये 2012 च्या सुमारास अल-सुफा संघटनेची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याची सुरुवात 40-45 तरुणांनी मिळून केली होती. हळूहळू या दहशतवादी संघटनांची संख्या वाढत गेली. संघटनेच्या सुरुवातीला असजद आणि जुबेर यांचा महत्त्वाचा वाटा होता. सुरुवातीच्या काळात इस्लाम धर्माचा प्रचार करून मुस्लिम समाजातील लोकांना जोडून ठेवण्याचा त्यांचा उद्देश होता. पण, त्यानंतर त्यांनी तरुणांची धर्माकडे दिशाभूल करण्याचे काम सुरू केले.

एनआयएने सात वर्षांपूर्वी सहा सदस्यांना पकडले होते : सुफा संघटनेशी संबंधित मुख्य लोक हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांच्या सदस्यांवरही देशद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत. 2015 मध्ये रतलाममधील अल-सुफावर कारवाई करताना एनआयएने छापा टाकला होता. संघटनेचा म्होरक्या असजद याच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून आक्षेपार्ह धार्मिक साहित्य आणि देशविरोधी कारवायांशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत.

2017 मध्येही चर्चेत : 2017 मध्येही अल सुफा संघटना जोमाने सक्रिय होत होती. रतलामच्या तरुण खून प्रकरणात अल-सुफाच्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये झुबेर आणि अल्तमास यांचा समावेश होता. अनेक वर्षे शांत राहिल्यानंतर ही संघटना पुन्हा दहशतवादी घटना घडवण्याच्या तयारीत आहे. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट अंमलात आणण्यापूर्वीच पकडला गेला. पुण्यात केलेल्या कारवाईत 5 जणांना अटक करण्यात आली. या अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांमध्ये एका डॉक्टरचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे हा डॉक्टर अनेस्थेशियन असून उच्च शिक्षित आहे.

हेही वाचा :

  1. Terrorist Arrested: सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांना पुण्यात अटक; गस्तीवरील दोन पोलिसांनी धाडसाने कशी कारवाई केली?
  2. Militant Arrested In Pune: पुण्यात आणखी एका संशयित अतिरेक्याला अटक; पाच दिवसांची पोलीस कोठडी
  3. Pune Crime News: 'त्या' दोन सुफा दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांकडून ड्रोनचे साहित्य जप्त; संवेदनशील ठिकाणी स्फोट करण्याचा होता डाव

Last Updated : Jul 31, 2023, 7:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.