ETV Bharat / state

आज...आत्ता....रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - state

एकाही प्रश्नाचे उत्तर न दिलेल्या मोदींची गिनीज बुकने नोंद घ्यावी अशी बोचरी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे....तनुश्री दत्ता प्रकरणी नाना पाटकरांना कोणतीही क्लीन चिट नाही - अॅड. नितीन सातपुते.....चंद्रकांत पाटील कधी खरे बोललेले मी ऐकले नाही म्हणत जयंत पाटीलांनी डागली तोफ....नंदूरबारमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात १ ठार तर १२ जखमी झाले....वैद्यकीय प्रवेशाच्या संरक्षणासोबत एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

*बातमी, सर्वांच्या आधी...*
author img

By

Published : May 17, 2019, 11:58 PM IST

महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार संभाजी पाटील यांचे निधन

कोल्हापूर - महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार संभाजी पाटील यांचे दीर्घ आजाराने आज सायंकाळी निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. संभाजी पाटील यांनी बेळगावच्या केएलई रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. नुकतेच त्यांचे चिरंजीव सागर याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता.

एकाही प्रश्नाचे उत्तर न दिलेल्या मोदींची गिनीज बुकने नोंद घ्यावी - धनंजय मुंडे

मुंबई - गेल्या ५ वर्षांपासून माध्यमाच्या पुढे जाऊन पत्रकार परिषद घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मोदी यांच्यावर एका ट्विटच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर -

तनुश्री दत्ता प्रकरणी नाना पाटकरांना कोणतीही क्लीन चिट नाही - अॅड. नितीन सातपुते

मुंबई - मागील काही दिवसांपासून नाना पाटेकर यांना तनुश्री दत्ता प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. या सर्व बातम्या केवळ अफवा असून नाना पाटेकर यांना कोणतीही क्लीन चिट मिळाली नसल्याचे तनुश्री दत्ता प्रकरणाचे काम पाहणारे वकील नितीन सातपुते यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर -

चंद्रकांत पाटील कधी खरे बोललेले मी ऐकले नाही - जयंत पाटील

सांगली - चंद्रकांतदादा कधी खरे बोललेले मी ऐकले नाही. राज्यातील जनतेवर काय आपत्ती आली आहे, याचीही चंद्रकांत पाटलांना जाणीव नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुष्काळावरून केली आहे. माणसे गोळा करणे, निवडणूक लढवणे याच्या पलीकडे चंद्रकांत पाटलांना काहीही येत नाही. त्यामुळे आता २४ तासात महाराष्ट्रात किती टँकर येतात ते मोजू, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. सांगलीच्या ऐतवडे बुद्रुक येथे ते बोलत होते. वाचा सविस्तर -

नंदूरबारमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात; १ ठार, १२ जखमी

नंदुरबार - जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील शिरसानी गावातील लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडींना घेऊन भुजगाव येथे परत जात असताना महिंद्रा पिक-अप (क्रमांक एम एच २० - ३७६३) या वाहनाला अपघात झाला. या अपघातात १ ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर -

वैद्यकीय प्रवेशाच्या संरक्षणासोबत एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेले प्रवेश संरक्षित करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित कायद्यात तात्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासोबतच एसईबीसी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागलेल्या, अथवा घ्यावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काचीही प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनाही शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर -

Intro:Body:

akshay - bulletin 12 am

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.