ETV Bharat / state

Ajit Pawar BJP Alliance : महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न? अजित पवारांची भूमिका संशयास्पद - एकनाथ शिंदे गट

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत फूट पडण्यासाठी भाजप पूर्ण प्रयत्नशील आहे. यासाठी त्यांनी आता विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, अजित पवार यांनाच पुन्हा हाताशी धरल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. अजित पवार यांचा भाजपसोबत सरकार स्थापनेचा पहिला प्रयोग अयशस्वी झाल्यानंतर आता दुसऱ्या प्रयोगासाठी रंगीत तालीम सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांनी मात्र या चर्चा निराधार असल्याचे सांगितले. तरीसुद्धा, एकंदरीत त्यांच्या सध्याच्या हालचालीवरून त्यांची भूमिका संशयास्पद दिसून येते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, दुर्दैवाने असे काही झाल्यास मी भाजपसोबत जाणाऱ्यांसोबत नसेन, मी महाविकास आघाडी सोबतच राहीन, असे सांगितल्याने अजित पवारांच्या भूमिकेवर त्यांनाच विश्वास नसल्याचेही आता स्पष्ट होते.

Ajit Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, अजित पवार
author img

By

Published : Apr 17, 2023, 3:33 PM IST

मुंबई : एकनाथ शिंदे गटाचे ४० आमदार फुटून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. परंतु शिंदे गटाने घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनता नाराज आहे. त्याचा फटका त्यांना येणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, अशी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. महाविकास आघाडी राज्यात सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. ही महाविकास आघाडी फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही आमदार फोडण्याच्या प्रयत्नात भाजप आहे.

शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र : हे आमदार राज्याचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय खेळी भाजपकडून सध्या खेळली जात असल्याची चर्चा जोरात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार व वरिष्ठ नेते संजय राऊत यांनी याविषयी भाष्य करताना, शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होत असल्याने त्यांच्या जागी राष्ट्रवादीच्या १६ आमदारांना आपल्यासोबत घेण्याचा षडयंत्र भाजपने रचल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अजित पवारांचे काय? येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व सध्याच्या राजकीय परिस्थितीत सध्या अजित पवार यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे कारण म्हणजे यापूर्वी सुद्धा अजित पवार यांनी एका विशिष्ठ परिस्थितीत भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले होते. सध्या अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांच्या मागे सुद्धा ईडी व इतर तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे. त्यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखाण्यात ईडीच्या धाडी पडल्या. हा कारखाना जप्त केला गेला आहे.

ईडीची कारवाई : हे प्रकरण अद्याप संपलेले नाही आहे. त्यातच हसन मुश्रीफ यांच्यावर सुद्धा ईडीची मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. हसन मुश्रीफ हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जातात. म्हणून तुरुंगात कोणाला जायचे नाही. त्याऐवजी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनीही तुरुंगात न जाता भाजप मध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला, त्या पद्धतीने अजित पवार किंवा राष्ट्रवादीतील इतर नेते हे भाजपच्या वाटेवर जाणार की नाही याबाबत अजित पवार यांनी खुलासा करायला हवा, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मी महाविकास आघाडी सोबतच : सध्याच्या घडामोडीवर बोलताना संजय राऊत असे म्हणाले आहेत की, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले की, कोणालाही मनापासून पक्ष सोडून जायचे नाही. पण कुटुंबाला टार्गेट केले जात असल्याने काहींना त्यांचे व्यक्तिगत निर्णय घ्यावे लागतात. तो त्यांचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणार नाही. मी महाविकास आघाडी सोबतच राहीन अशी ठोक भूमिका शरद पवार यांनी घेतल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत ज्या हालचाली अजित पवारंकडून होताना दिसत आहेत, त्या पाहता त्यांची भूमिका संशयास्पदच आहे.

अजित पवारांची भूमिका : अचानक १८ तास कोणाच्याही संपर्कात न राहून अज्ञातवासात जाणे. त्यानंतर तब्येतीचे कारण समोर आणून आपण आराम करत असल्याचे सांगने. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तासभर भेट घेणे. पंतप्रधानांच्या डिग्रीच्या मुद्द्यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता त्यावर त्याला महत्त्व न देता. भाजपची बाजू सावरणे. १६ अपात्र आमदार झाले तरीसुद्धा सत्ता भाजपकडेच राहील, असे छातीठोकपणे सांगणे. पंतप्रधान मोदी यांच्या कामाची स्तुती करत काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे. ही सध्याची परिस्थिती व अजित पवार यांच्या घडामोडी लक्षात घेता नक्कीच ते भाजपच्या जवळीक जाण्याच्या प्रयत्नात असल्याचही दिसून येत आहे. म्हणूनच फक्त महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे यांनाच नाही, तर खुद्द शरद पवार हेही अजित पवार यांच्या भूमिकेबद्दल आता ठामपणे सांगू शकत नाही हे निश्चित आहे.

लोकसभा निवडणूक मिशन ४५ : यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन ४५ ठरवले आहे. त्या दृष्टिकोनातून सध्याच्या परिस्थितीत तरी त्यांना तितके खासदार निवडून आणणे अशक्यच आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप या युतीने एकत्रित जागा लढल्या होत्या. त्यामध्ये त्यांना ३५ ठिकाणी यश प्राप्त झाले होते. केंद्रातसुद्धा शिवसेना-भाजप सोबत असल्याने त्यांच्या खासदारांचा भाजपला पाठिंबा होता. मात्र आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोबत नसल्याने त्यांच्याशिवाय राज्यात पुन्हा तितकेच खासदार निवडून आणणे, हे भाजपसाठी मोठे आव्हान असणार आहे.

महाविकास आघाडी भक्कम : २०१९ मध्ये शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. त्यातील १३ खासदार हे आता जरी एकनाथ शिंदे गटासोबत गेले असले तरीसुद्धा त्यातील पुन्हा किती निवडून येतील, हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. अशातच राज्यात महाविकास आघाडी भक्कम स्थितीत दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी भाजपला फोडायची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात फोडण्याचे जोरदार प्रयत्न भाजपकडून होत आहे. लवकरच ते जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा : Praveen Darekar: दिवा विझायच्या अगोदर फडफडतो, तशी उद्धव ठाकरे यांची अवस्था- प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.