ETV Bharat / state

Ajit Pawar On Lathicharge : राज्यसरकार आंदोलकांच्या भावनांशी सहमत, अजित पवारांनी दिले दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश - जालन्यातील घटनेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया

जालन्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केलाय. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसंच आंदोलकांच्या भावनेशी सहमत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Ajit Pawar On Lathicharge)

Ajit Pawar On Lathicharge
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 5:51 PM IST

मुंबई Ajit Pawar On Lathicharge : जालन्यातील अंतरवली सराटा गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला. त्यानंतर मराठा समाजाकडून राज्यभर सरकार विरोधात निदर्शनं केली जातं आहे. आंदोलकांविरोधात पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार आणि बळाचा केलेला गैरवापर याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच राज्यसरकार आंदोलकांच्या भावनांशी सहमत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

राज्य सरकारची चर्चा करण्याची तयारी : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवलीत मराठा समाज बांधव उपोषण करत होते. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला. पोलिसांच्या या लाठी हल्ल्यामुळे मराठा समाज बांधवांच्या आणि राज्यातील जनतेच्या मनात तीव्र भावना आहे. राज्य सरकार देखील या भावनांशी सहमत आहे. आपण सरकार म्हणून गंभीर दखल घेतली आहे. राज्य सरकारची मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलंय. (Lathicharge on Maratha Protester)

हिंसाचार थांबवण्यासाठी आवाहन : जालन्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यावर उमटत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दगडफेक, जाळपोळ आणि काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारच्या घटना त्वरित थांबण्याची गरज आहे. हिंसाचारामुळं राज्याच्या संपत्तीचं नुकसान होत आहे. दगडफेक करून लोकांना इजा पोहचू शकते, त्यामुळे हिंसाचार टाळावे. लोकशाहीच्या मार्गाने सुरू झालेलं आंदोलन पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राज्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी पुढं यावं, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.

  • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेबाबत मराठा बांधवांसह…

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चर्चेतून मार्ग काढायची तयारी : राज्याच्या साधनसंपत्तीचं नुकसान होणार नाही. यातून आपल्या माता-भगिनींच्या, बांधवांच्या जीवाला धोका पोहचणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. सरकारची चर्चेतून मार्ग काढायची तयारी आहे. मराठा बांधवांचा, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरू असलेला हिंसाचार तात्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहील, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया अशा प्रकारचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'X' सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरती केलंय. (Maratha Protester in Jalna)

हेही वाचा :

  1. Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - शरद पवारांचा घणाघात
  2. Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठीचार्ज; राज्यभरात मराठा समाज आक्रमक
  3. Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.