ETV Bharat / state

Ajit Pawar On Assembly Speaker : जावई म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक काळजी घ्या ! - अजित पवार - Ajit Pawar On Assembly Speaker

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( NCP Leader Ajit Pawar ) यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. विधान परिषदेच्या अध्यक्षांचे जावई या नात्याने आमचेही जावई आहात, त्यामुळे आमची अधिक काळजी घ्या, असे अजित पवारांनी म्हणताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

ajitpawar
ajitpawar
author img

By

Published : Jul 3, 2022, 4:02 PM IST

मुंबई - राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Rahul Narvekar ) यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडणूक झाल्यानंतर अभिनंदनाच्या भाषणात अजित पवार ( NCP Leader Ajit Pawar ) यांनी राहुल नार्वेकर यांची स्तुती आपल्या शैलीत केली. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना जे जमलं नाही ते राहुल नार्वेकर यांनी अडीच वर्षात करून दाखवावे, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काढला. राहुल नार्वेकर हे आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. तसेच राहुल नार्वेकर हे राम राजे निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही जावई झाले. त्यामुळे अध्यक्ष बनून त्यांनी आमच्याकडे जास्त लक्ष द्यावे, असा चिमटाही अजित पवार यांनी आपल्या भाषणातून काढला.

राहुल नार्वेकर यांना 2014 सली राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, त्यावेळेस असलेल्या मोदींच्या लाटेत निवडून येऊ शकले नाही. तथापि, पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी घेतेवेळीच जर आपण निवडून आलो नाही तर आपल्याला विधान परिषदेवर पक्षाने पाठवावे असे ठरवून घेतल्यामुळे त्यांना विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठवावे लागले. राहुल नार्वेकर हे दूरदृष्टी ठेवणारे नेते आहेत, अशी स्तुती अजित पवार यांनी आपल्या भाषणातून केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.