मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय नाट्यातील उत्सुकता आजही कायम आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना भेटण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरेंनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी पुन्हा सुनावणी, रविवारी झाला असा युक्तीवाद
अजित पवार यांना सत्तास्थापनेबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. भाजप आपले बहुमत सिद्ध करण्यात नक्कीच यशस्वी होणार, त्यामुळेच शपथविधी करण्यात आला. आमचा अजित पवार यांना पाठींबा आहे, असे जन सुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.