मुंबई Ajit Pawar Group Opinion : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह आपलचं असल्याचा दावा विधानसभा अध्यक्ष (Rahul Narvekar) आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या समोर सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना आपापलं म्हणणं मांडण्यासाठी एका आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाच्या 10 आमदारांनी 10 पानी लेखी स्वरूपात आपलं म्हणणं दोन दिवसांपूर्वीच वकिलामार्फत विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं आहे.
म्हणणं मांडण्यास मुदत वाढ द्या : शरद पवार गटाने अजित पवार यांच्यासह गेलेल्या सर्व आमदारांना अपात्र करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी अजित पवार गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती; मात्र अजित पवार गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 1 महिन्याची मुदत वाढ हवी आहे. त्यासाठी त्यांनी विधानभवन प्रशासनाकडे मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, 31 जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 51 आमदारांच्या अपात्रे संदर्भात निर्णय देणे बंधनकारक आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एक महिना मुदतवाढ न देता दोन आठवडा मुदतवाढ देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
विरोधकांकडून राहुल नार्वेकरांना लक्ष्य : शिंदे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निर्णयाच्या भूमिकेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना वारंवार महाविकास आघाडीतील घटक पक्ष लक्ष्य करीत आहे. त्याचाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदार अपात्रितेच्या भूमिकेबाबत देखील महाविकास आघाडी मधील पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या टीकेला कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि त्याचं चिन्ह कोणाचं यावरून शरद पवार आणि अजित पवार गटात वाद सुरू आहे. याबाबत निर्णय देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दोन्ही गटाने मागणी केली आहे. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही.
हेही वाचा:
- Narendra Modi: 'नितीश कुमारांना काही लाज वाटत नाही', लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून मोदींचा हल्लाबोल
- Crop Insurance Farmer: आनंदाची बातमी; दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये पिक विमा होणार वितरित - धनंजय मुंडे
- Manoj Jarange On OBC: ओबीसी नेत्यांमुळे चाळीस वर्षे आमच्यावर अन्याय, तर मराठा नेत्यांमुळे नुकसान; मनोज जरांगेंचा हल्लाबोल