ETV Bharat / state

Ajit Pawar Dengue :  उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण-प्रफुल्ल पटेल यांची माहिती - खासदार प्रफुल पटेल

DCM Ajit Pawar Dengue : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शनिवारी डेंग्यू झाला. ही माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलीय.

DCM Ajit Pawar Dengue
DCM Ajit Pawar Dengue
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 11:31 AM IST

Updated : Oct 29, 2023, 12:12 PM IST

मुंबई DCM Ajit Pawar Dengue : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झालीय. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट करत याची माहिती दिलीय. तसंच डॉक्टरांनी त्यांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला असल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.

प्रफुल पटेलांनी काय म्हटलं : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक कार्यक्रमांत उपस्थित नसल्यानं ते पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चांना उत्तर देताना प्रफुल्ल पटेलांनी त्यांनी डेंग्यूची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिलीय. शनिवारपासून अजित पवार यांना डेंग्युची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मार्गदर्शन आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, सार्वजनिक कर्तव्यं पुढं चालू ठेवतील असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

  • Contrary to speculative media reports suggesting that Shri Ajit Pawar is not attending public events, I would like to clarify that he has been diagnosed with dengue since yesterday and has been advised medical guidance and rest for the next few days. Shri Ajit Pawar remains…

    — Praful Patel (@praful_patel) October 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यात डेंग्यूचा थैमान : राज्यात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसेंदिवस राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसंच डेंग्यू या आजारानं सध्या थैमान घातलंय. अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण वाढच आहेत. त्यामुळं लक्षण दिसताच वेळीच उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य यंत्रणेनं केलंय.

घरातच उपचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सध्या घरातच उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी सार्वजनीक कार्यक्रमांना हजेरी न लावल्यानं राज्यात अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच मराठा आरक्षणावरून त्यांचा बारामतीचा दौरा रद्द झाला होता. सकल मराठा समाजाच्यावतीनं पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आल्यानं त्यांच्या दौऱ्यालाही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. शनिवारी अजित पवार माळेगाव साखर कारखान्यातील मोळी पुजनासाठी जाणार होते. मात्र त्यांना गावबंदीचा फटका बसल्याचं दिसतंय. मराठा आंदोलकांचा पवित्रा पाहून अजित पवारांनी बारामतीचा दौरा रद्द केल्याच्या चर्चा होती.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation Protest : मंत्र्यांची गाडी अडवली, खासदाराची गाडी फोडली; तर बालेकिल्ल्यात 'दादां'ना गावबंदी, मराठा आंदोलक आक्रमक
  2. National Games 2023 : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; अजित पवारांनी घेतली महाराष्ट्राच्या पथकाची भेट, राज्याचा ध्वज सुपूर्द

Last Updated : Oct 29, 2023, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.