ETV Bharat / state

विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवारांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह

विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धरला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे वडेट्टीवार नेमणूक करावी अशी मागणी करणार असल्याचे पवार म्हणाले.

जित पवार आणि विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jun 16, 2019, 6:45 PM IST

मुंबई - विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धरला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे वडेट्टीवार नेमणूक करावी अशी मागणी करणार असल्याचे पवार म्हणाले. पवार यांच्या या भूमिकेमुळे उद्या विधानसभेत वडेट्टीवार यांच्या नावावर विरोधीपक्ष नेते म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

विरोधीपक्ष नेतेपदासाठी अजित पवारांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह

वडेट्टीवार यांच्या नावासाठी आज विरोधीपक्षाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याला सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली आहे. माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याने विरोधीपक्ष नेतेपद हे विधानसभेत रिकामे होते. त्यावर काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच वडेट्टीवार यांचे नाव जाहीर केले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदी वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे.

Intro:
विरोधीपक्ष नेतेपदासाठी अजित पवार यांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह
(यासाठी मोजोवरून अजित पवार यांचे फीड पाठवलेले आहे, ते घ्यावेत)
मुंबई, ता. १६ :
विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीचे विधानमंडळातील नेते अजित पवार यांनी धरला आहे. यासाठी त्यांनी आज आपण विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक करावी अशी मागणी करणार आहोत अशी माहिती देत त्यासाठीची आपली भूमिका जाहीर केली. पवार यांच्या या भूमिकेमुळे उद्या विधानसभेत वडेट्टीवार यांच्या नावावर विरोधीपक्ष नेते म्हणून मोहोर उमटली जाणार आहे.
वडेट्टीवार यांच्या नावासाठी आज विरोधीपक्षाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला, त्याला सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश करून आज मंत्रिपदाची शपथ घेतल्याने विरोधीपक्ष नेतेपद हे विधानसभेत रिकामे होते. त्यावर काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच वडेट्टीवार यांचे नाव जाहीर केले असतानाच आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काँग्रेसचाच विरोधीपक्ष नेतेपदी वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रह धरत त्याविषयी आपण विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
राज्यात सत्ताधारी भाजपाकडून विरोधीपक्षाच्या नेत्यांना फोडण्याचे काम केले जात असल्याने त्याविषयी पवार यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात आत्तापर्यंत अशा प्रकारे विरोधीपक्षाच्या नेत्यांना फोडण्याचे काम कधीही झालेले नाही. लोकशाहीत विरोधीपक्षाचे स्थान हे कायम महत्वाचे असते, भाजपाचा हा प्रवास चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. परंतु भाजपाकडे आज देशात आणि राज्यात इतके लोक निवडून आलेले असताना विरोधीपक्षातील लोक का घेताहेत, असा सवाल केला.
Body:
विरोधीपक्ष नेतेपदासाठी अजित पवार यांनी धरला वडेट्टीवार यांच्या नावाचा आग्रहConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.