ETV Bharat / state

राज्यात महिलांची सुरक्षा वेशीवर टांगलीय!, अजित पवारांचा भाजपवर निशाणा - महिलांची सुरक्षा

राज्यात महिलांची सुरक्षा वेशीवर टांगलीय! असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

अजित पवार
author img

By

Published : Aug 30, 2019, 12:00 AM IST

मुंबई - राज्यात महिलांची सुरक्षा वेशीवर टांगलीय! असे म्हणत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. मुंबईत झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर मृत्यूशी झुंज देत असलेल्या जालन्यातील तरुणीने अखेर औरंगाबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. याच मुद्यावरुन पवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

जालन्यातील तरुणीवर चार जणांनी केलेल्या पाशवी बलात्कारानंतर या मुलीचा कमरेपासून खालचा भाग पूर्णतः निकामी झाला होता. नराधमांनी केलेल्या सामुहिक अत्याचारामुळे पीडितेला शारिरीक वेदनेसह प्रचंड मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यातून तिला सावरता आले नाही. अत्याचारामुळे झालेल्या रक्तस्त्रावाने तिची प्रकृती अधिक नाजूक अवस्थेत गेली होती. त्यानंतर तिचा बुधवारी मृत्यू झाला.

या घटनेवरुन अजित पवारांनी भाजपवर चांगलीच टीका केली. कायद्याचा धाक नसल्याने गुन्हेगारी फोफावतेय? पोलीस खातं काय करतंय? गृहमंत्री काय करतायेत? असे सवाल अजित पवारांनी केले आहेत.

Intro:Body:

RENUKASHEREKAR

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.