ETV Bharat / state

Ajit Pawar and Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेला गैरहजर; शरद पवार म्हणाले... - शरद पवार पत्रकार परिषद

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार आणि सुप्रिया सुळे अनुपस्थित राहिल्याने आता अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा पक्षातील इतर नेत्यांनी विरोध केला असतानाही या दोघांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. मात्र शरद पवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar
अजित पवार सुप्रिया सुळे शरद पवार
author img

By

Published : May 5, 2023, 6:43 PM IST

Updated : May 5, 2023, 7:06 PM IST

शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती दिली. मात्र त्यांच्या या पत्रकार परिषदेला त्यांचे पुतणे व विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांची कन्या व खासदार सुप्रिया सुळे अनुपस्थित होते. यावर शरद पवार यांनी, 'सगळेच सगळ्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही', अशी प्रतिक्रिया दिली. तसेच अजित पवारांना माझ्या राजीनाम्याची पूर्वकल्पना होती, असेही ते म्हणाले.

राजीनाम्यानंतर अजित पवार शांत होते : शरद पवारांनी 2 मे रोजी त्यांच्या आत्मचरित्राच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान अचानक अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाने उपस्थित राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल इत्यादी नेत्यांनी त्यांच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता. या सर्वांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची जाहीर विनवणी केली होती. मात्र या सर्व घटनाक्रमादरम्यान अजित पवार आणि सुप्रिया सुळे मात्र शांत होते. त्यांनी नेते व कार्यकर्त्यांना शांत राहून हा निर्णय स्वीकारण्याची अपील केली होती.

कुटुंबाला निर्णय आधीच माहीत होता : शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या देहबोलीवरून त्यांना हा निर्णय आधीच माहीत होता, असे लक्षात येते होते. इतर नेत्यांप्रमाणे त्यांनी शरद पवारांच्या या निर्णयाचा विरोध न करता तो सर्वांनी स्वीकारावा अशी भूमिका घेतली होती. तसेच शरद पवार यांचे नातू रोहीत पवार देखील या मुद्यावर मौन बाळगून होते. त्यामुळे शरद पवारांनंतर रोहीत पवारांवर पक्षाची मोठी जबाबदारी टाकण्यात येईल, अशा चर्चा देखील होऊ लागल्या होत्या.

राष्ट्रवादीत दोन गट पडले? : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदासाठी जयंत पाटलांचे नाव आघाडीवर होते. यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार आणि जयंत पाटील असे दोन गट पडले, अशा शक्यता देखील वर्तवण्यात येत होत्या.

हेही वाचा : Sharad Pawar Resignation Withdraw : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला मागे

Last Updated : May 5, 2023, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.