ETV Bharat / state

AC Local Trains : मुंबईत एसी लोकलला भरभरून प्रतिसाद, रेल्वेला 32 कोटींचा महसूल - Travel by air conditioned local

लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. मुंबईत दररोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने प्रवाशांसाठी एसी लोकल सुरू केली आहे. मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे रेल्वेला 32 कोटींचा महसूल मिळाला आहे.

AC Local Trains
AC Local Trains
author img

By

Published : May 27, 2023, 10:39 PM IST

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे माहिती देतांना

मुंबई : मुंबई शहर असो कि उपनगर परवडणार आणि सुरक्षित प्रवास म्हणजे लोकलचा प्रवास. लोकला मुंबईची लाईफ लाईन म्हणून लोकलला ओळखले जाते. लाखोच्या संख्येने मुंबईत दररोज लोकलने प्रवास करत असतात. प्रवास सुखकर व्हावा म्हणून रेल्वेकडून प्रवाशांसाठी एसी लोकल सुरू करण्यात आली. मध्य रेल्वेवरील वातानिकुलित लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. प्रवाशांचा भरघोस प्रतिसादामुळे रेल्वेला तब्ब्ल 32 कोटींचा महसूल मिळाला मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी दिली आहे.

मुंबईत वाढलेले तापमान उपाय म्हणून अनेक प्रवासी वातानुकूलित लोकलच्या माध्यमातून प्रवास करत आहे. एसी लोकल च्या माध्यमातून सरासरी 12 ते 15 लाख लोक प्रवास करत आहे. 1 जानेवारीपासून राज पर्यंत ७२ लाख प्रवाशांनी वातानिकुलित लोकलमधून प्रवास केला आहे. मध्य रेल्वे ला यातून 32 कोटींचा महसूल मिळाला आहे.- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

AC Local Trains
AC Local Trains
  • प्रवाशांची महिनावार वाढ, महसूल आणि दैनंदिन सरासरी खालीलप्रमाणे आहे.
  • महिना जानेवारी
    प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १३.४९
    महसूल (कोटींमध्ये) ५.८१
    दैनिक सरासरी (प्रवासी) ४३,५३०

  • महिना फेब्रुवारी
    प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १३.५०
    महसूल (कोटींमध्ये) ५.९४
    दैनिक सरासरी (प्रवासी) ४८,२२५
  • महिना मार्च
    प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १५.१८
    महसूल (कोटींमध्ये) ६.७३
    दैनिक सरासरी (प्रवासी) ४८,९८
  • महिना एप्रिल
    प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १५.०३
    महसूल (कोटींमध्ये) ७.०८
    दैनिक सरासरी (प्रवासी) ५०,१०३

  • महिना मे ०१.०५.२०२३ ते ३१.०५.२०२३ पर्यंत
    प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १४.१३
    महसूल (कोटींमध्ये) ६.६६
    दैनिक सरासरी (प्रवासी) ५८,८८०

  • महिना – (प्रक्षेपित) मे ०१.०५.२०२३ ते ३१.०५.२०२३ पर्यंत
    प्रवासी संख्या (लाखांमध्ये) १६.००
    महसूल (कोटींमध्ये) ७.५०
    दैनिक सरासरी (प्रवासी) ६००००

वातानुकूलित लोकलच्या 56 फेऱ्या सुरू : दीड वर्षापूर्वी मध्य रेल्वे कडून सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला होता.मध्ये रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. मध्य रेल्वे 4 रेक सह वातानुकूलित लोकलच्या 56 फेऱ्या सध्या सुरू आहे.वर्षभरापूर्वी भाडे कमी केल्यानंतर सुरक्षित आणि मस्त राइड ऑफर आल्याने प्रवाशी संख्यत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोकलचे तिकीट खरेदी करूनच प्रवास करावा अशी आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.