ETV Bharat / state

Bullet Train BKC Station : बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्टेशनसाठी अखेर 'करार'नामा; 'असे' असेल एकमेव भूमिगत स्टेशन

मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबई येथील बीकेसी स्टेशनसाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने दोन कंपन्यांसोबत करार केला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन कंपन्यांचा यात समावेश आहे. बीकेसी येथील बुलेट ट्रेन स्टेशनच्या डिझाइन आणि बांधकामाशी संबंधित कामासाठी करार केला आहे. त्यामुळे आता लवकरच स्टेशनच्या कामाला सुरुवात होणार आहे.

bullet train
बुलेट ट्रेन
author img

By

Published : Mar 20, 2023, 9:37 PM IST

Updated : Mar 20, 2023, 10:47 PM IST

नवी दिल्ली/मुंबई - सध्या मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेन प्रक्लपाचे काम सध्या जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. जवळपास 506 किलोमीटरचा हा बुलेट ट्रेनचा मार्ग असणार आहे. मुंबईच्या बीकेसी स्टेशन येथून ही बुलेट ट्रेन अहमदाबादसाठी सुटेल. याच स्टेशनच्या डिझाईन आणि बांधकामासाठी दोन कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्र भागातील कामाचे हे पहिले करार आहेत.

  • मुंबई-अहमदाबाद हाई स्पीड रेल पर भी हम तेजी से आगे बढ़ रहे हैं: पीएम @narendramodi जी

    🇮🇳🤝🇯🇵 pic.twitter.com/kIyOwiacDD

    — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) March 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकूण किती खर्च - NHSRCL च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे महाराष्ट्राच्या बाजूने दिले जाणारे हे पहिले कंत्राट निघाले आहे. बीकेसी स्टेशन कॉम्प्लेक्सचे एकूण क्षेत्रफळ 4.85 हेक्टर असणार आहे. तसेच एकूण खर्च अंदाजे 3 हजार 681 कोटी रुपये अपेक्षित आहे. हे काम सुरू होण्याच्या तारखेपासून ते एकूण पूर्ण होण्याचा कालावधी हा 54 महिने अपेक्षित असणार आहे.

कसे असेल बीकेसी स्टेशन- मुंबईतील बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशनला सहा प्लॅटफॉर्म असणार आहेत. तसेच प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे 415 मीटर राहणार आहे. ही लांबी 16 डब्यांची बुलेट ट्रेन बसवण्यासाठी पुरेशी असणार आहे. हे बुलेट ट्रेन स्टेशन मेट्रो आणि जवळील महत्वाच्या रस्त्यांशी जोडले जाणार आहे. तसेच हवा खेळती राहण्यासाठी विशेष खिडक्या बसवण्यात येणार आहेत. याबरोबरच सुर्यप्रकाश थेट स्टेशनमध्ये यावा यासाठी खास यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

  • #NHSRCL has signed an agreement for the work related to the design and construction of the underground Mumbai High-Speed Rail Station with M/s MEIL-HCC Joint Venture (comprising of M/s Megha Engineering & Infrastructure Ltd. and M/s Hindustan Construction Company Limited). pic.twitter.com/m4xPWvQCEZ

    — NHSRCL (@nhsrcl) March 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकमेव भूमिगत स्टेशन - मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बीकेसी हे एकमेव भूमिगत स्टेशन असणार आहे. या स्टेशनचा प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 24 मीटर खोलीवर नियोजित केलेला आहे. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असतील. दोन एंट्री/एक्झिट पॉइंट्स केले जाणार आहेत.

स्थानकांवर प्रवाशांसाठी नियोजित सुविधा - बीकेसी येथील बुलेट ट्रेन स्टेशनवर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये सुरक्षा, तिकीट, प्रतीक्षा क्षेत्र, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, स्वच्छतागृहे, धूम्रपान कक्ष, माहिती कियॉस्क आणि प्रासंगिक रिटेल, सार्वजनिक माहिती आणि घोषणा प्रणाली तसेच सीसीटीव्हीच्या निगराणीखाली हे स्टेशन असणार आहे.

bullet train
बुलेट ट्रेन महत्वाचे मुद्दे

पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट - मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अनेकठिकाणी वेगात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट समजला जात आहे. अरबी समुद्रात बोगदा उभारून त्यातून ट्रेनचा मार्ग तयार करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रातील चार बुलेट ट्रेन स्टेशनशचे अजून पाहिजे त्या गतीने काम सुरू झाले नसल्याचे चित्र 'ईटीव्ही भारत'च्या 'फॅक्ट चेक'मधून दिसून आले होते.

हेही वाचा - Bullet Train Profile : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा कसा असेल प्रवास; मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचे प्रगतीपुस्तक

Last Updated : Mar 20, 2023, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.