ETV Bharat / state

इस्त्रायली अग्निशमन तंत्रज्ञानाच्या खरेदीबाबत होणार करार - मुंबई अग्निशमन दल

अग्निशमन दलाला प्रशिक्षण आणि इस्त्रायली अद्ययावत तंत्रज्ञानाच्या खरेदीबाबत करार करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

Israeli fire technology
भेट घेताना इस्त्रायली अग्निशमन दल
author img

By

Published : Nov 27, 2019, 7:35 AM IST

मुंबई - शहरावरील 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्त्रायली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबई अग्निशमन दलाच्या भेटीसाठीसाठी दाखल झाले आहे. दहशतवादी हल्ल्यात मुंबई अग्निशमन दलाने मोठी कामगिरी केली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला प्रशिक्षण आणि इस्त्रायली अद्ययावत तंत्रज्ञानाच्या खरेदीबाबत करार करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

इस्त्रायली अग्निशमदल अत्यंत अद्ययावत असून दलाचे अधिकारी मुंबई अग्निशमन दलाला प्रशिक्षित करणार आहेत. अग्निशमन दलाला नव्या आव्हानांशी सामना करावा लागत असून 26-11 च्या निमित्ताने अग्निशमन दलाचे आधुनिकीरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीबाबत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात चर्चा होणार आहे. दहशतवादी हल्ल्यातील हॉटेल ताज, कुलाबा येथील नरीमन हाऊसला हे शिष्टमंडळ भेट देणार आहे. या हल्ल्यात अग्निशमन दलाने बजावलेल्या कामगिरीची माहिती हे शिष्टमंडळ घेणार आहे. अग्निशमन दलाला अद्ययावत करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या खरेदीबाबतचे करारही होण्याची शक्‍यता असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

हेही वाचा - यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी राज्याच्या विधानभवनाचा झाला 'राजकीय आखाडा'

Intro:मुंबई - मुंबईवरील 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्त्रायली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबई अग्निशमन दलाच्या भेटीसाठीसाठी दाखल झाले आहे. दहशतवादी हल्ल्यात मुंबई अग्निशमन दलाने मोठी कामगिरी केली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला प्रशिक्षण आणि इस्त्रायली अद्ययावत तंत्रज्ञानाच्या खरेदीबाबत करार करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.Body:इस्त्रायली अग्निशमदल अत्यंत अद्ययावत असून दलाचे अधिकारी मुंबई अग्निशमन दलाला प्रशिक्षित करणार आहेत. अग्निशमन दलाला नव्या आव्हांनांशी सामना करावा लागत असून 26-11 च्या निमित्ताने अग्निशमन दलाचे आधुनिकीरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची देवाण घेवाणीबाबत दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात चर्चा होणार आहे. दहशतवादी हल्ल्यातील हॉटेल ताज, कुलाबा येथील नरीमन हाऊसला हे शिष्टमंडळ भेट देणार आहे. या हल्ल्यात अग्निशमन दलाने बजावलेल्या कामगिरीची माहिती हे शिष्टमंडळ घेणार आहे. अग्निशमन दलाला अद्ययावत करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या खरेदीबाबतचे करारही होण्याची शक्‍यता असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.