ETV Bharat / state

Climate Change : हवामान बदलाबाबत धोक्याची घंटा ; पर्यावरण संरक्षणाबाबत युनिसेफ व महाराष्ट्र शासनाचा करार

जलसंधारण आणि पर्यावरण पूरक जीवनशैली (Agreement regarding environmental protection) यावर संशोधन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला (Agreement UNICEF and Maharashtra Government) आहे.

Climate Change
पर्यावरण संरक्षणाबाबत युनिसेफ व महाराष्ट्र शासनाचा करार
author img

By

Published : Nov 15, 2022, 9:01 AM IST

मुंबई : आसाम, आंध्र प्रदेश आणि नंतर महाराष्ट्र राज्यात मोठे पर्यावरण बदल होत आहेत होणार आहे. या संकटाची चाहूल शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांना लागली आहे. या संकटाला सामोरे जण्यासाठी शासन देखील तयारी करत आहे. त्यामुळेच जलसंधारण आणि पर्यावरण पूरक जीवनशैली (Agreement regarding environmental protection) यावर संशोधन करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला (Agreement UNICEF and Maharashtra Government) आहे.

पर्यावरण पूरक प्रकल्प : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदल पर्यावरण पूरक कसे राहतील, याबाबत नुकताच महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ७ लाख तरुण हवामान बदलाचे योद्धे म्हणून कार्य करणार आहेत. राज्यामधील खेड्यापाड्यात या संदर्भात युवकांच्या माध्यमातून पर्यावरण पूरक प्रकल्प राबवले (environmental protection) जातील.

जनजागृती निर्माण : यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, हवामान बदलाचा धोका आणि भविष्यातील पाण्याची निर्माण होणारी टंचाई लक्षात घेऊन राज्य शासनाने सन 2014-19 या कालावधीत जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे पाण्याचा साठा वाढला आणि लोकांमध्ये पावसाचे पाणी कसे साठवले पाहिजे. याबाबत जनजागृती निर्माण झाली. नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण, बदलत्या हवामानाला प्रतिसाद देण्यासाठी आणि पाण्याची बचत करण्यासाठी तरुणांना एकत्र आणण्याचा निश्चय केला आहे.

हवामान धोका : युनिसेफ प्रमुख राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या की, आगामी काळामध्ये युनिसेफने हवामान बदलावर कृती आणि तरुणांचा सहभाग हा प्रमुख कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवला आहे. इजिप्तमधील कॉप २७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर युनिसेफ हा प्रकल्प आखणी करीत आहे. कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायर्मेंट अॅण्ड वॉटर इंडियाने २०२१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अहवालानुसार, आसाम आणि आंध्र प्रदेश नंतर हवामान धोक्याच्या पातळीवर असलेले महाराष्ट्र हे तिसरे राज्य (Climate Change) आहे.

वॉटर फूटप्रिंट ऍप्लिकेशन डॅशबोर्ड : जलसंवर्धन कार्यक्रम प्रत्यक्षात राबवताना नियमित निरीक्षण नोंदणी आणि अहवाल बनवण्यासाठी 'वॉटर फूटप्रिंट ऍप्लिकेशन डॅशबोर्ड' विकसित करण्यात येईल. त्यात स्वयंसेवकांची भरती, नोंदणी डेटाबेसदेखील होणार आहे. या सहकार्य कराराचे उद्दिष्ट युनिसेफच्या सहाय्याने पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याचे कार्य करण्यात येणार (Agreement between UNICEF and Maharashtra) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.