ETV Bharat / state

'ना फेरीवाला क्षेत्रा'वर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण; नागरिक त्रस्त

author img

By

Published : Sep 10, 2019, 9:04 PM IST

फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काची जागा देण्यात यावी, अशी मागणी मुंबई फेरीवाला सामाजिक संस्थेने केली होती. मात्र, पालिकेने त्यांना प्रतिसाद दिला नाही.

'ना फेरीवाला क्षेत्रा'वर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण

मुंबई - रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त करण्याचा महापालिकेचा मनसुबा धुळीस मिळताना दिसत आहे. दादर पश्चिम येथे पालिकेने लावलेले 'ना फेरीवाला क्षेत्र' फलक फक्त नावापुरते उरले असून फेरीवाल्यांनी मात्र 'जैसे थे' परिस्थिती केली आहे. त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना गर्दीतून वाट काढतच चालावे लागत आहे. महापालिकेचे फलक असूनसुद्धा फेरीवाल्यांची विक्री अजून सुरूच आहे.

'ना फेरीवाला क्षेत्रा'वर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण; नागरिक त्रस्त

हेही वाचा - वांद्र्यात शिक्षणमंत्री शेलार यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालयाचे लोकार्पण

मुंबई पालिकेकडून फेरीवाल्यांवर अधूनमधून कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही पुन्हा पुन्हा तेच चित्र पाहायला मिळत आहे. पालिकेने फेरीवाला धोरणाबाबत ठोस कार्यवाही केली नसल्याने रस्त्यावर अतिक्रमण होत असून, त्यामु‌ळे वाहतूककोंडी होत आहे. पालिकेच्या उपाययोजनाही तुटपुंज्या असल्याने अशी परिस्थिती तयार होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा - बाप्पा निघाले गावाला...गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाची चोख तयारी

फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काची जागा देण्यात यावी, अशी मागणी मुंबई फेरीवाला सामाजिक संस्थेने केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे पालिकेने लक्ष दिले नाही. फेरीवाल्यांच्या वस्तू उचलल्या जातात; मात्र राजकीय वरदहस्त असलेली अनाधिकृत बांधकामे, वाढीव बांधकामे, हातगाड्या यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा 'ना फेरीवाला क्षेत्रा'वर फेरीवाल्यांचे अतिक्रमण होत असल्याने लोकांना रस्त्यावरून चालताना मोठी डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा - पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'

Intro:

'ना फेरीवाला क्षेत्रा' वर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण.

रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर पर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त करण्याचा महापालिकेचा मनसूबा धुळीस मिळताना सध्या दिसत आहे. दादर पश्चिम येथे पालिकेने लावलेले 'ना फेरीवाला क्षेत्र' असे लिहिलेले फलकच असून येथे फेरीवाल्यांनी आपले वास्तव मांडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना गर्दीतून वाट काढतच चालावे लागत आहे.महापालिकेचे फलक असून सुद्धा फेरीवाल्यांची विक्री अजून सुरूच आहे.

मुंबई पालिकेकडून फेरीवाल्यांवर अधूनमधून कारवाई केली जात आहे. मात्र तरीही पुन्हा ते येऊन बसतात. पालिकेने फेरीवाला धोरणाबाबत ठोस कार्यवाही केली नसल्याने रस्त्यावर अतिक्रमण होत असून, त्यामु‌ळे वाहतूककोंडी होते. एकूणच या विषयाबाबत पालिकेने पुन्हा काही तरी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

फेरीवाल्यांना बसण्यासाठी हक्काची जागा देण्यात यावी, अशी मागणी मुंबई फेरीवाला सामाजिक संस्थेने केली होती पण त्यांना मिळाली नाही म्ह्णून ते पुन्हा बसतायेत. फेरीवाल्यांच्या वस्तू उचलल्या जातात; मात्र राजकीय आशीर्वाद असलेली अनधिकृत बांधकामे, वाढीव बांधकामे, हातगाड्या यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप लोकं करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ना फेरीवाला क्षेत्रावर फेरीवाल्यांचे पुन्हा अतिक्रमण हे लोकांना रस्त्यावरून चालताना डोके दुःखी ठरत आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.