ETV Bharat / state

आज... आत्ता...गुरुवारी दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - ETV

कोकणसह कोल्हापुरात मान्सून दाखल झालेला आहे, तर दुसरीकडे पावसाळी अधिवेशनात उसळीत चिकनची मिसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची मागणी अजित पवार यांनी केली आहे. खासदार तडस यांनी आर्वी दुर्घटनेतील पीडित मुलाची भेट घेतली, तर नाशकात रिक्षा चालकाने तरुणाची छेड काढल्याची घटना घडली आहे. शिवाय संसदेतील स्टायलिश खासदार अभिनेत्री नुसरत जहां लग्नबेडीत अडकली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jun 20, 2019, 1:58 PM IST

खुशखबर...! कोकणसह कोल्हापुरात मान्सून दाखल

पुणे - दक्षिण कोकण आणि कोल्हापूरमध्ये गुरुवारी मान्सून दाखल झाला आहे. याबाबतची माहिती पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यप यांनी दिली आहे. वाचा सविस्तर...

विधिमंडळ अधिवेशन: उसळीत चिकनची 'मिसळ', अजित पवारांनी केली भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची मागणी

मुंबई - विधिमंडळ कँटींगमधील मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे निघाल्याचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. अजित पवार यांनी याप्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला. उसळीत चिकनचे तुकडे निघाल्याचे प्रकरण गंभीर आहे. राज्यभर भेसळ आणि दर्जाहीन अन्नाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. काय खावे, असा प्रश्न नागरिकांपुढे आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली. वाचा सविस्तर...

खासदार तडस यांनी आर्वीतील पीडित चिमुकल्याची घेतली भेट; कुटुंबाला दिला मदतीचा हात

वर्धा - आर्वी येथे घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये जखमी झालेल्या चिमुकल्याची रुग्णालयामध्ये खासदार रामदास तडस यांनी भेट घेतली. प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊन पीडित मुलाच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच त्या कुटुंबाला २५ हजार रुपयांची शासकीय मदत, तर ५ हजार रुपयांची वैयक्तीक मदत त्यांनी यावेळी दिली. वाचा सविस्तर...

'तू मुझे अच्छे लगती है'असं म्हणत रिक्षा चालकाने काढली तरुणीची छेड, मुलीने चालत्या रिक्षातून घेतली उडी

नाशिक - 'तू मुझे अच्छी लगती है'असे म्हणत रिक्षा चालकाने 18 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नाशकात घडली. यानंतर घाबरलेल्या मुलीने रिक्षामधून रस्त्यावर उडी मारली. रवी गोफणे, असे त्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वाचा सविस्तर...

संसदेतील स्टायलिश खासदार अभिनेत्री नुसरत जहां अडकली लग्नबेडीत, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली - अभिनय क्षेत्रातून राजकारणात एन्ट्री घेतलेली बंगाली अभिनेत्री तसेच आता तृणमूल काँग्रेसची खासदार असलेली नुसरत जहां हिने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. बुधवारी (१९ जून) उद्योगपती असलेल्या निखिल जैन यांच्याशी 'टर्की' येथे नुसरतने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नववधुच्या रुपात असलेली नुसरत जहां खूपच सुंदर दिसत आहे. वाचा सविस्तर...

*बातमी, सर्वात आधी*
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.