नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत, काशी विश्वनाथ मंदिरात केली पूजा
वाराणसी - नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल ते वाराणसीच्या लोकांचे आभार मानले. या दौऱ्यात मोदी यांनी प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात पूजनही केले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांच्या सभेलाही संबोधित केले. मोदींनी वाराणसीत ४.७९ लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला. वाचा सविस्तर...
नागपुरात कुख्यात गुंडाची हत्या, कारण अस्पष्ट
नागपूर - शहरातील कुख्यात गुंडाची रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाचगाव जवळील डोंगरगाव येथे हत्या करण्यात आली. कार्तिक तेवर, असे मृत गुंडाचे नाव असून हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, जुन्या वादातून ही हत्या झाली असाल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. वाचा सविस्तर...
पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरला आग; तासभर वाहतूक प्रभावित
मुंबई - गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरच्या केबिनमध्ये आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. वाचा सविस्तर...
हेल्मेट सक्ती कारवाई बेतली जीवावर, पोलिसाने काठी फेकून मारल्याने तरुण गंभीर
नाशिक - शहरात पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू असताना कारवाईच्या भीतीने पळ काढणाऱ्या एका दुचाकीस्वाराला पोलिसानी काठी फेकून मारल्याने शुभम महाले हा युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलीस आमची तक्रार दाखल करून घेत नसल्याचे शुभमच्या आईने सांगितले. वाचा सविस्तर...
बोरघाटातील चढावरून आरामबस मागे सरकली, कठड्यावर अडकल्याने जीवितहानी टळली
रायगड - मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आरामबस अवघड वळणावर कोसळून अपघात झाला. या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असून एक महिला जखमी झाली आहे. आयआरबी यंत्रणा व पोलीस बस काढण्याचा प्रयत्न करीत आहे. या अपघाताने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वात आधी...
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra