ETV Bharat / state

Pune Lok Sabha By Election : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पुण्यात राजकीय खलबते सुरू - गिरीश बापट

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष निवडणूक लढवणार, यावरून पुण्यात खलबते सुरू झाले आहे. गिरीश बापट यांच्या निधनाला चार दिवसही होत नाहीत तर पोटनिवडणुकीच्या राजकीय चर्चोला उधान आले आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्याने पोटनिवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे.

Pune Lok Sabha By Election
Pune Lok Sabha By Election
author img

By

Published : Apr 1, 2023, 7:35 PM IST

मुंबई : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीतील कुठला पक्ष निवडणूक लढवणार यावरून आत्ताच राजकीय चुरस रंगली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाला चार दिवसही झाले नसल्याने ही रंगलेली राजकीय चढाओढ पाहता ही लढाई अतिशय अटीतटीची होणार यात शंका नाही. मागील महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय झाल्याने पोटनिवडणुक रंगतदार होणार असल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे.

भाजप विरुद्ध महाविकास आघाडी : भाजपच्या कसबा पेठमधील आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागेवर महिन्याभरापूर्वीच पोटनिवडणूक झाली. या जागेवर भाजपला हमखास विजयाची खात्री होती. मात्र, भाजपने रणनीती आखलेली असताना कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा या पोटनिडणुकीत विजयी झाला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून याची दखल राष्ट्रीय स्तरावर पक्षाकडून घेतली गेली.

विरोधकांची रस्सीखेच सुरू : अशातच आता पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार, वरिष्ठ नेते गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर या जागी सुद्धा पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीची घोषणा अद्याप घोषणा झाली नसुन तरी सुद्धा महिन्याभरापूर्वीचा इतिहास पाहता आतापासूनच विरोधकांची रस्सीखेच सुरू झाली आहे. ही जागा आम्ही लढवणारच असे ठामपणे माजी मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे थोडे सबुरीने घ्या, इतकी घाई करण्याची गरज नाही. कारण गिरीश बापट यांच्या निधनाला तीनच दिवस झाले आहेत, असा प्रेमाचा सल्ला विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला आहे.

बापट यांच्या कुटुंबात उमेदवारी : कसबा पेठ पोटनिवडणुकीचा पराभव हा भाजपच्या जिव्हारी लागल्याने महा विकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. पुणे लोकसभा निवडणुक या विषयी काँग्रेस किंवा त्यांचे नेते उघडपणे बोलत असले तरीसुद्धा भाजपने न बोलता पुणे मतदार लोकसभा संघासाठी आखणी करायला सुरुवात केली आहे. या विभागातून गिरीश बापट यांच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी द्यायची की, इतर उमेदवार द्यायचा याची चाचपणी सुरू झाली आहे. कसबा पेठची जागा हातातून गेल्याने भाजपची रणनीती फोल ठरली.

भाजपची आतापासूनच आखणी: माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देण्यावरून मोठ्या प्रमाणात खलबत्त झाली होती. यावरून भाजपच्या वरिष्ठ स्तरावर सुद्धा दुमत निर्माण झाले होते. शेवटी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली गेली होती तरी, सुद्धा एक गट त्यांच्या उमेदवारीने नाराज होता. याचाच फटका भाजपला या निवडणुकीत बसला. तसेच त्यांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. परंतु त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या जागेसाठी भाजपकडून वरिष्ठ नेत्यांनी आतापासूनच आखणी करायला सुरुवात केली असून पडद्याआड मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.

महाविकास आघाडी सक्रिय : २०२४ च्या लोकसभा, विधानसभाच्या निवडणुकीच्या पूर्वी होणारी पुणे लोकसभेची ही पोटनिवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. राज्यात, देशात निर्माण झालेली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत कशा पद्धतीने जनता सामोरी जाते याकडे सर्वांचाच लक्ष असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही बाजूने कसोशीचे प्रयत्न होणार आहेत. त्यातच कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्याने काँग्रेसचाच नाही तर, महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे.

नाना पटोलेंना विश्वास : त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुक आम्ही जिंकू असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. किमान समान कार्यक्रमांतर्गत आम्ही एकत्र आलो असून यामुळेच महाविकास आघाडी स्थापना झाली होती. आम्ही राज्यात सरकार सुद्धा स्थापन केले होते. परंतु आता मोदी सरकारला पाडण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही एकत्र आहोत असे त्यांनी सांगितलेल आहे. सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीसुद्धा या जागेसाठी पूर्ण प्रयत्नशील असून भाजपचा मागचा इतिहास पाहता सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

हेही वाचा - Anil Jaisinghani Bail : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरण; बुकी अनिल जयसिंघानीचा जामीन फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.