ETV Bharat / state

Home Department meetings : पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्या नंतर गृह विभागांच्या बैठकांचे सत्र सुरू! - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST workers' agitation) केले. यावेळी तेथे चप्पल फेकण्यात आल्या या प्रकारानंतर गृहविभाग खडबडून जागा झाला आहे. सध्या गृहविभागाच्या बैठकांचे सत्र (Home Department meetings ) सातत्याने सुरु आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.

Home Minister Dilip Walse Patil
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Apr 10, 2022, 3:31 PM IST

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला. या नंतर राज्यातील पोलिस यंत्रणा तसेच गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करते? या बाबतचा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची बैठक बोलावली. बैठकीत घटनेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सदावर्ते यांच्या आरोपांबाबत चर्चा - एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून तसेच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अर्थमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपाबाबत कायदेशीर कारवाई करता येईल का? याची देखील चाचपणी या बैठकीत झाल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. उद्या सदावर्ते यांना कोर्टात हजर करावे लागेल. यावेळी सदावर्ते यांच्या विरोधात राज्य सरकारकडून योग्य ते कायदेशीर पुरावे न्यायालया समोर ठेवावे याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.

सुप्रिया सुळे आणि गृहमंत्र्यांची भेट - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या बैठकीनंतर देखील दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षेत काही त्रुटी राहील्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्या त्रुटी नेमक्‍या का राहिल्या? त्या त्रुटींबाबत पुढे नेमकी काय पावले उचलली गेली. याबाबतची चर्चा या बैठकीत झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गृह विभाग तसेच पोलिसांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी - शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 9 एप्रिलला वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी गृहविभाग पोलीस आणि राज्याच्या गुप्तचर यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त केली होती. पोलिसांकडून राहिलेल्या त्रुटी मुळेच आंदोलन थेट शरद पवार यांच्या घरापर्यंत पोहोचु शकले. या प्रकरणात पुढे त्रुटी राहू नयेत यासाठी गृहमंत्री आणि पोलिस यंत्रणांकडून बैठकीचे सत्र सुरू झाले आहे.

हेहीवाचा : Inquiry Committee : शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलन प्रकरणी विश्वास नागरे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.