मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस टिळक भवन या पक्ष कार्यालयात दोन दिवस बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवस बैठका असणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी बैठकीला सुरुवात झाली. राज्यातील लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला जात आहे. शुक्रवारी 23 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
मतदारसंघाचा आढावा : जिल्हा प्रभारी, आजी माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, 2019 लोकसभा, विधानसभा काँग्रेस उमेदवार, जिल्ह्यातील आघाडी संघटना व विभागाचे अध्यक्ष यांच्याकडून काँग्रेस हे लोकसभा मतदारसंघातील आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुढची रणनिती ठरवली जाणार असल्याची चर्चा आहे.
आजच्या बैठकीत ४८ जागांचा आढावा घेतला जाईल : सर्व नेते, आजी माजी आमदार खासदार, पदाधिकारी, सगळ्या संघटनांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.प्रत्येक बुथवरचा आढावा घेतला जाईल. आगामी निवडणुका कशा जिंकता येतील याबाबत चर्चा केली जाईल. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा निर्णय आहे.महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कशी मदत करता येईल याचा देखील यात आढावा घेतला जाणार आहे.भाजपला कसं हरवता येईल ही आमची भूमिका आहे.महाविकास आघाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही. महाविकास आघाडी पक्की आहे शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली यावर काँग्रेसचा इतर गोष्टीत इंटरेस्ट नसल्याचे नाना पटोले म्हणाले.
![Congress](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18656590_congress.jpg)
त्यांच्या घरी अदानी राहायला गेले तरी : गुरुवारी रात्री उशिरा उद्योगपती अदानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, शरद पवार यांचा वेगळा पक्ष आहे. ते काँग्रेसचे नाहीत. कोण कोणाला भेटणार याबाबत कोणावर जबरदस्ती करता येत नाही. आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आलो आहोत. अदानी उद्या त्यांच्या घरी राहायला गेले तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत की मोदी आणि अदानी यांचा संबंध काय? अदानी यांना सगळं काम का दिलं जातं? अदानी यांच्याबद्दल व्यक्तिगत वाद नाही. पण देश विकून सगळं त्यांना का दिलं जातं हा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.