ETV Bharat / state

Railway Website : 2019 नंतर मुंबई लोकलच्या मार्गावर घडलेल्या अपघातांची वेबसाईटवर नोंदच नाही - Railway website

मुंबई विभागीय रेल्वे हद्दीमध्ये मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे किंवा हार्बर रेल्वे या कुठल्याही रेल्वे मार्गावर (Mumbai Local route) कुठलाही प्रवासी जखमी झाल्यास त्याच्या संदर्भातली नोंद ही दररोज वेबसाईटवर अपलोड करणे (Railway website) हे बंधनकारक होते. मात्र 2019 नंतर (After 2019) याबाबत कोणतीही माहिती मध्य व पश्चिम रेल्वेच्या वेबसाईटवर दिलेली नाही. परिणामी कोणत्याही प्रवाशास आपला नातेवाईक जखमी झाला आहे किंवा मृत झाला आहे, हे कळण्यामध्ये मोठे अडथळे उभे (no record of accidents) राहतात. परिणामी आपल्या नातेवाईकाचा ठाव ठिकाणा त्यामुळे कळत नाही. आणि ही माहिती वेबसाईटवर नमूद न करणे हा मुंबई उच्च न्यायालयाच्या अवमान होतो.

No Record On Mumbai Railway Website
अपघातांची वेबसाईटवर नोंदच नाही
author img

By

Published : Jan 8, 2023, 5:53 PM IST

प्रतिक्रिया देतांना याचिकाकर्ते समीर झवेरी

मुंबई : मध्य रेल्वेवर 40 लाख पेक्षा अधिक प्रवासी रोज प्रवास करतात. कसारा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि कर्जत ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पनवेल ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणू (Mumbai Local route) पर्यंत एकूण रोज 35 लाख प्रवासी प्रवास करतात. तर एकूण तिन्ही रेल्वे मार्गावरील मध्य-पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर 70 लाख पेक्षा अधिक संख्येने प्रवास करीत असतात. लाखो लोक रोज मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनने प्रवास करतात आणि प्रचंड गर्दीमुळे रोज विविध प्रकारचे छोटे मोठे अपघात होतात. तर दरवर्षी सुमारे 3000 लोकांचा लोकल ट्रेनमुळे अपघाताने मृत्यू होतो.

मुंबई उपनगरीय एकूण 120 रेल्वे स्थानक आहेत : दररोज शेकडो अपघात रेल्वे मार्गावर होतात आणि सुमारे वर्षभराला 3000 लोकांचा मृत्यू रेल्वेच्या अपघाताने होतो. विशेषतः रेल्वे फलाट वरून गाडीमध्ये चढत असताना काही अपघात होतात, तर कधी उतरताना अपघात होतात. तर कधी कधी अचानक रेल्वे मार्गावर जात असताना गाडी समोरून दिसली नाही आणि तेवढ्यात अपघात होतो किंवा काही जण धक्का लागून पडतात. अशा विविध कारणांनी छोटे-मोठे अपघात होतात आणि हे अपघात झाल्यावर रेल्वे यंत्रणा (Mumbai Divisional Railway) विशेष करून रेल्वे पोलीस दल, रेल्वे कर्मचारी अशावेळी त्या जखमी व्यक्तीला संबंधित रुग्णाला दाखल करतात. कारण हा 2009 च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला आदेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 24 तास जखमी व्यक्तींना मदत करणारी यंत्रणा तैनात हवी.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच : रेल्वे पोलीस दल 24 तास रेल्वे स्थानकादरम्यान आणि रेल्वे स्थानकात तैनात असतात. त्यामुळे कोणतीही घटना घडल्यास त्यांची जबाबदारी असते. ते त्याची तपासणी व चौकशी करत असतात आणि त्याची नोंदणी देखील त्यांच्या डायरीत होते. मात्र रेल्वे यंत्रणेने या संदर्भात हा तपशील केवळ नोंदवहीत न ठेवता आपल्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर (Railway website) तो रोज अपडेट करावा; असे मुंबई उच्च न्यायालयाचे 2009 मध्ये आदेश होते. या आदेशानुसार अपघात झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकास नेटवरून केव्हाही तपशीलवार योग्य ती माहिती त्यातून उपलब्ध होते. त्यामुळे नातेवाईक त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतात. कारण या माहितीमध्ये कोणत्या रुग्णाला दाखल केले? कधी दाखल केले? कधी अपघात झाला? अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव रेल्वे स्थानक इत्यादी माहिती त्यामध्ये नमूद असते.

रोज जखमी प्रवाशांची माहिती अपलोड करणे आवश्यक : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत जे निर्देश दिलेले आहे .त्यात नमूद आहे की,त्यामध्ये लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षा संदर्भात रेल्वेकडे उपाययोजना म्हणून कोणती यंत्रणा आहे. याबाबत त्यावेळेला रेल्वेने ती उपाययोजना करावी असे न्यायालयाने सांगितलं होतं आणि त्यानुसारच कोणत्याही व्यक्तीचा बळी जाणे म्हणजे त्याच जीवन वाया जाणे होय. म्हणजेच राज्यघटनेच्या जगण्याच्या हक्काचे उल्लंघन होते. जर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाच्या कुठल्याही रेल्वे स्थानकाच्या दरम्यान अपघात घडला आणि त्याची नोंद त्या त्या संकेतस्थळावर केली तर नातेवाईकांना नंतर त्याबाबत आपल्या जखमी व्यक्ती किंवा मृत झालेल्या व्यक्तीस शोधणे सोपे जाते आणि त्यांची पायपीट त्यांचा त्रास वाचतो.

'हा' न्यायालयाचा अवमान : यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन का केले नाही म्हणून, याचिकाकर्ते आणि रेल्वे प्रवासी समीर झवेरी आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी या संदर्भात ईटीव्ही सोबत बातचीत केली ते म्हणाले, 'मुंबई महानगर फार मोठे आहे. तिन्ही रेल्वे लाईन म्हणजे पश्चिम मध्य आणि हार्बर मिळून 120 रेल्वे स्थानक आहेत. आणि रोज लाखो लोकल ट्रेनने प्रवास करतात. शेकडो लोकांचा अपघात रोज होतो आणि दरवर्षाला सुमारे 3000 लोक या अपघातामुळे मृत्यू पावतात. खूप गर्दीमुळे काही अपघात होतात; हे जरी खरी असलं तरी, जर तात्काळ जखमी व्यक्तीस संबंधित डॉक्टरांकडे रुग्णालयात औषध उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचतो. आणि याबाबतची महत्त्वाची यंत्रणा रेल्वेकडे असली पाहिजे; असं न्यायालयाने म्हटलं. आणि एवढेच नव्हे तर याबाबतची माहिती आपल्या संकेतस्थळावर रोज अपडेट करून ती नोंदवावी. असे सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालय दिले होते.

2019 नंतरची नोंदच नाही : मात्र आता 2019 नंतर(After 2019) ही माहिती मध्य रेल्वेच्या वेबसाईटवर दिसत (no record of accidents) नाही. त्यामुळे या दोन-तीन वर्षात किती अपघात झाले? किती मृत्यू झाले? हे कळायला मार्गच नाही आणि त्या अपघात झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना माहिती मिळू शकत नाही. 'याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी वेबसाईटवर तातडीने ती माहिती उपलब्ध न केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान म्हणून पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी 'ईटीवी' सोबत बातचीत करताना दिलेला आहे. यासंदर्भात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे संदेश पाठवून आणि फोन करून विचारणा केली असता, रविवार असल्यामुळे ते व्यस्त होते. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मात्र सुमित ठाकूर यांनी सांगितले की, 'याबाबत उद्या कार्यालय खुली होतील तेव्हा सगळी माहिती घेऊन मग नंतर आपल्याशी बोलतो.'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.