मुंबई - राज्यातील वृत्तपत्रात छापून आलेल्या जाहिरातीवरून दिवसभर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होते. मंत्री शंभूराज देसाईंनी यावर मंत्रालयात पत्रकार परिषदेत घेऊन खुलासा केला. संबंधित जाहिरात शिवसेना शिंदे गटाने दिलेली नसून एका हितचिंतकांने दिली. हा हितचिंतक अज्ञात आहे, अशी सारवासारव केली. दरम्यान, हितचिंतक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरतो. मात्र बाळासाहेबांना कसा विसरतो, हितचिंतक कोण? पन्नास लाखांची जाहिरात देणाऱ्या हितचिंतकांची ईडी चौकशी लावणार का? आदी प्रश्नांच्या सरबत्तीने देसाईंची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर थातूरमातूर उत्तरे देत, वेळ मारून नेली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून शिंदे गट-भाजपमधील अंतर्गत वाद धुमसत असताना, शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे, असे 43 टक्के पंसती असलेली पूर्ण पान भर जाहिरात शिंदे गटाकडून राज्यातील वृत्तपत्रात दिली. दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा फोटो जाहिरातीत नव्हता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो जाहिरातीत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो जाहिरातीत छापण्यात आले. विरोधकांनी यावरुन शिंदे गटावर टीकास्त्र सोडत खोचक टोले लगावले होते. भाजपनेही शिंदे गटाचे कान टोचले. शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांकडून यानंतर खुलासा करण्याची स्पर्धा रंगली. मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल, असे स्पष्ट केल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेले उत्तर अजबच असल्याचे दिसून आले.
मंत्री शंभूराज देसाई असे म्हणाले की, संबंधित जाहिरात शिवसेना शिंदे गटाने दिलेली नाही. आमच्या हितचिंतकाने ही जाहिरात दिली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. आमचे सरकार चांगले काम करत आहे, असे स्पष्ट केले. शिवसेना शिंदे गटाचा हितचिंतक कोण? असा प्रश्न विचारला असता, हितचिंतक अज्ञात असल्याचे सांगत सारवा-सराव करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस या जाहिरातीमुळे नाराज असल्याच्या चर्चेवरही शंभूराज देसाईने भाष्य केले. कोणी नाराज नाही. आमच्यात शंभर टक्के तडे जाणार नाहीत. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. बाळासाहेबांनी जपलेल्या युतीला टिकवून ठेवण्याचे काम करत आहोत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत, आगामी निवडणूक कशाप्रकारे लढवायची यावर चर्चा सुरू असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. हितचिंतकांची ईडी चौकशी लावणार का? पक्ष अधिकृत असताना जाहिरात परस्पर कशी प्रकाशित केली जाते, आदी प्रश्नांवर उत्तर देताना मंत्री देशांची चांगली तारांबळ उडालेली दिसली.
जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात, प्रश्नांच्या सरबत्तीने मंत्री शंभूराज देसाईंची भंबेरी - भाजपमधील अंतर्गत वाद
मुख्यमंत्री शिंदे जास्त लोकप्रिय असल्याची जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात असल्याचे मंत्री शंभुराज देसाई यानी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यांच्यावर झालेल्य प्रश्नांच्या सरबत्तीने मंत्री शंभूराज देसाईंची भंबेरी उडाल्याचे दिसून आले.