मुंबई : शिक्षक मंडळींचे लक्ष लागून असलेल्या महत्वाच्या निवडणुका पुढील काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. ( Adverse effects on schools ) 30 जानेवारी रोजी राज्यातील शिक्षक मतदार संघाचे मतदान होणार आहे. यातून शिक्षक मतदार संघातून कोण निवडून येत आहे. याबाबतची रस्सीखेच सुरू झालेली आहे. ( Criticism of Maharashtra Education Council ) राज्य विधानपरिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण 5 जागांसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदान होणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. तर 4 फेब्रुवारी रोजी मतदानाची सर्व प्रक्रिया होईल. उद्धव ठाकरे गटाचे शिक्षक ( Teacher of Uddhav Thackeray group ) ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिंदे गटामध्ये उडी घेतल्यामुळे कोकण मतदारसंघात ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली : या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून 5 जानेवारी रोजी आचारसंहितेची सुरुवात केली जाईल. इच्छुक उमेदवारांना 12 जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरावा लागेल. 13 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जातील त्रुटी दुरुस्ती केल्या जातील आणि 16 जानेवारीपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही शिक्षक प्रचारामध्ये जोडले गेल्यामुळे त्याचा परिणाम शाळांवर आणि विद्यार्थ्यांवर होत असल्याची टीका शिक्षक वर्तुळातून केली जाते आहे. (Teachers are engaged in election )
पदवीधर मतदारसंघ चुरशीची निवडणूक : पदवीधर मतदारसंघांपैकी नाशिक आणि अमरावती या पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातून डॉ. रणजीत पाटील यांची मुदत 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे. या दोन्हीही मतदारसंघातून हे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पाच जागांसाठी जी निवडणूक होत आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने नाशिक अमरावती या ठिकाणी पदवीधर तर औरंगाबाद नागपूर आणि कोकण या शिक्षक मतदार संघासाठी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत.( Election in Teachers Constituency )
राज्यात ज्या पाच जागा आहेत : त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक, भाजप एक, काँग्रेस एक, शेकाप एक आणि एका जागेवर अपक्ष आहे. यामध्ये शेकापची जागा काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत आहे. तर नाशिक मधून काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती मधून भाजपचे रणजीत पाटील, तर औरंगाबाद मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे आणि कोकण मधून शेकापाचे बाळाराम पाटील व नागपूर मधून नागो गाणार हे 2017मध्ये विजयी झाले होते.
शिक्षक मतदारसंघात भाजपा केंद्रीय मंत्र्यांचे नातेवाईक उभे राहणार शिक्षक मतदार संघापैकी औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक या मतदारसंघातील विद्यमान आमदारांची मुदत ही 7 फेब्रुवारी रोजी संपणार असल्याने या मतदारसंघात या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार विक्रम काळे हे असून ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात मैदानात येणार आहेत. नागपूर शिक्षक मतदार संघात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा एकदा याच मतदारसंघातून शिक्षक परिषदेने उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजप शिक्षक आघाडीने जोरदार लॉबिंग सुरू : कोकण शिक्षक मतदार संघातून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षाकडून संधी दिली आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादी आणि इतर सहयोगी पक्षांकडून त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला नाही. त्यातच याच मतदारसंघात शिंदे गटाच्या शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मागील सहा महिन्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र त्यांच्या विरोधात या मतदारसंघात भाजप शिक्षक आघाडीने जोरदार लॉबिंग सुरू केली आहे.
मतदारसंघातील निवडणूक मोठी रंगतदार ठरण्याची शक्यता : ठाणे जिल्ह्यातील विद्यमान केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुतण्यांना ऐनवेळी भाजप शिक्षक आघाडी मार्फत उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याने म्हात्रे यांची गोची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना मानणारा एक गट ऐनवेळी या मतदार संघात उतरण्याच्या तयारीत असल्याने या मतदारसंघातील निवडणूक मोठी रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. मात्र शिक्षक आपली शाळा सोडून निवडणुकीच्या प्रचाराच्या कामांमध्ये व्यस्त असतात ही बाब मुलांच्या आणि शाळेच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहे. असे महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे शिंदे गटात जाऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता
सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारी ही निवडणूक : ज्ञानेश्वर म्हात्रे जे शिक्षक मतदार संघामध्ये उमेदवारी करू इच्छितात ते उद्धव ठाकरे गटामध्ये होते. आता ते शिंदे गटांमध्ये गेलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळेच ज्ञानेश्वर म्हात्रे यांची लढत अटीतटीची होईल यात काय संशय नाही. म्हात्रे यांच्या या खेळीमुळे अनेक समीकरण बदलणार आहेत. काही ठिकाणी शिक्षक भरती व जनता दल युनायटेड पुरस्कृत उमेदवार आहेत. जिथे त्यांची ताकद आहे तिथे काँग्रेसने त्यांना मदत केल्यास सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक जड जाणार आहे. यात काही वाद नाही. तसेच ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे. त्या ठिकाणी शिक्षक भारती आणि जनता तरुणायटेड यांनी त्यांना मदत केल्यास सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारी ही निवडणूक ठरू शकेल.
शिक्षकांवरच पुन्हा टीका : शिक्षक भारती यांच्या वतीने धनाजी पाटील यांना कोकण शिक्षक मतदार संघामधून उमेदवारी दिलेली आहे त्यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, निवडणूक ही राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे या निवडणुकी संदर्भात देखील त्या दृष्टीने पाहिले पाहिजेे. मात्र शाळांवर आणि शिक्षकांवर याचा परिणाम व्हायला नको. प्रचारामध्ये देखील शिक्षकांना ओढणे गरजेचे नाही. त्यामुळे शिक्षकांवरच पुन्हा टीका होते. त्यामुळे प्रशासनाने रोटेशन पद्धतीने शिक्षकांना निवडणुकीचे जे कामकाज द्यायला हवे. कायद्यानुसार त्यामध्ये ड्युटीचे नियोजन केले पाहिजे. अन्यथा त्याचा परिणाम शाळांवर किंवा विद्यार्थ्यांवर होतो, अशी टीका मग केली जाते.
दुहेरी कोंडीमध्ये शिक्षक : यासंदर्भात महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नेते शिवनाथ दराडे यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेने 555 अतिरिक्त शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या केलेल्या आहे. त्यामुळे शाळांवर त्याचा परिणाम होणार आहे आणि आता निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक शिक्षकांना अशैक्षणिक कामांमध्ये कामाला लावलेले आहे. म्हणजेच निवडणुकीच्या कारकुनी कामांची जबाबदारी दिली आहे. तसेच काही शिक्षक निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगलेले आहेत. त्यामुळे शाळांवर आणि विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. शाळांकडे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष अशा दुहेरी कोंडीमध्ये शिक्षक सापडलेला आहे. त्याच्यामुळे या सर्व प्रकारचा आम्ही निषेध करतो असे देखील शिवनाथ दराडे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये नमूद केले आहे.