मुंबई - सीरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे. सीरम इंस्टिट्यूटमध्ये आग लागली आहे की लावली गेली आहे हे बघायला हवे, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली आहे.
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागली आहे. पुण्यातील मांजरी परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोण पसरले होते. अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
हेही वाचा - २३ एप्रिलला बारावीची, तर दहावीची २९ एप्रिलपासून लेखी परीक्षा