मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी आणि संपूर्ण प्रशासकीय बाजू मारुती साळुंखे एकहाती सांभाळत होते. शिवसेना भवनमधून पक्षाचे सर्व प्रशासकीय कामकाज आणि राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांसोबत दररोज संपर्क साधण्याचे काम साळुंखे यांच्याकडे होते. पक्षाबाबत माहिती संकलित करण्यात साळुंखे तरबेज होते. शिवसेनेच्या सर्व सभा आणि बैठकांचे नियोजन करण्यापासून निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेल्यांना उमेदवाराला अर्ज देण्यापर्यंतचे काम त्यांनी सांभाळले आहे.
साळुंखेच्या अनुभवाचा लाभच: शिवसेनेच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या संपर्कात राहण्याचे कामकाज मारुती साळुंखे करीत होते. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचा दावा प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला आहे. शिंदे गटाच्या पक्ष उभारणीत मारुती साळुंखे यांचे मोठे योगदान लाभू शकते. त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा आणि जनसंपर्काचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना तळागाळात पोहोचवण्यासाठी साळुंखे यांचा मोठा उपयोग होणार असल्याचेही पावसकर म्हणाले.
नाशिकमध्येही शिंदे गटाची कास: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेआधीच नाशिकमधील 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी फेब्रुवारी, 2023 मध्ये शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सर्वांनी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते.
यामुळे केला शिंदे गटात प्रवेश: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत या सर्वानी प्रवेश केला. ज्यांनी शिवसेना जिल्ह्यात रुजवली वाढवली आशा शिवसैनिकांसोबत आनंद दिघे यांचे जुने सहकारी देखील यात सहभागी झाले आहेत. या सर्वांनी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.
अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार: एकीकडे शिवसेनेचे अनेक नेते संपर्कात असल्याचे वारंवार शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक नेते त्या दिवशी पक्ष प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.