मुंबई -लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यात शिवसेनेने लढवलेल्या 23 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. यात आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. आदित्य ठाकरे यांनी ह्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात सभा घेतल्या होत्या. त्याचा फायदा सेनेला मिळालाही. त्यामुळे आगामी विधानसभेत सुद्धा आदित्य ठाकरे यांची भूमिका मोठी असणार आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे.
शिवसेनाच्या जन आशीर्वाद यात्रा 18 जुलै पासुन सुरवात होणार आहे. यातील पहिला टप्पा 18 तारखेपासून जळगाव येथुन सुरवात होईल. 19 तारखेला धुळे व मालेगाव, 20 तारखेला नाशिक शहर, 21 तारखेला नाशिक ग्रामीण व नगर जिल्हा, तर 22 तारखेला नगर, श्रीरामपूर, शिर्डी याठीकाणी होणार आहे. यासाठी एकुण 4 हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास आदित्य ठाकरे करणार आहेत.