मुंबई - संसदीय राजकारणामध्ये ठाकरे घराण्याने आदित्य ठाकरेंच्या रूपाने पहिल्यांदाच प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत आमदार पदाची शपथ घेतली.
हेही वाचा- अजित पवारांनी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची घेतली भेट ; चर्चा गुलदस्त्यात
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच नशिब आजमावले होते. त्यात त्यांना यश आले. आज विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यामध्ये हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आदित्य ठाकरे यांनी शपथ दिली. त्यांच्या सोबतच २८७ आमदारांना आज शपथ दिली जाणार आहे.