ETV Bharat / state

महाराष्ट्रासाठी फासावरसुद्धा जायला तयार; आदित्य ठाकरेंची गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया - लोअर परेल पुल

Aaditya Thackeray : लोअर परेल पुलाचे (Lower Parel Bridge) उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल (FIR Against Aaditya Thackeray) करण्यात आला आहे.

Aditya Thackeray Reaction
आदित्य ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 6:29 PM IST

प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे

मुंबई Aaditya Thackeray : मुंबईतील लोअर परेल पुलाचे उद्घाटन (Lower Parel Bridge) वरळी मतदारसंघातील आमदार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केलं. या उद्घाटनानंतर त्यांच्यावर शुक्रवार रात्री गुन्हा दाखल करण्यात (FIR Against Aaditya Thackeray) आला आहे. तसंच यावरुन ठाकरे व शिंदे गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, आज आमदार आदित्य ठाकरे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. हा गुन्हा म्हणजे एक गंमत आहे आणि घटनाबाह्य मिंधे सरकारनं गुन्हा दाखल करण्यास पोलिसांवर दबाव टाकला. त्यामुळंच माझ्यावर गुन्हा दाखल झाला.

आज आजोबा असते तर त्यांना अभिमान वाटला असता : पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, या मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी एक गुन्हा काय? मी असे शेकडो गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे. परंतु मी महाराष्ट्र आणि मुंबईचे वाटोळे होऊ देणार नाही. आज माझ्यावर महाराष्ट्रासाठी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज माझे आजोबा असते तर त्यांना नक्कीच माझ्याबद्दल अभिमान वाटला असता. पुलाचं काम पूर्ण नसताना तुम्ही उद्घाटन कसं केलं?, असा प्रश्न विचारला असता, आता तुम्ही माझ्याबरोबर चला आपण पुलाचं काम पूर्ण आहे की, अपूर्ण आहे ते बघूयात. पुलाचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे. त्यानंतरच याचं उद्घाटन झालं. कारण घटनाबाह्य सरकार लोकांना सेवा देण्यासाठी किंवा लोकांची कामं करण्यासाठी कमी पडत आहे. मुंबईकरांचा त्रास आणि हाल आम्ही बघू शकत नाही. त्यामुळं लोकांसाठी, मुंबईकरांसाठी या पुलाचं उद्घाटन केलं.

मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी एक गुन्हा काय? मी असे शेकडे गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे. परंतु मी महाराष्ट्र आणि मुंबईचे वाटोळे होऊ देणार नाही. माझ्यावर महाराष्ट्रासाठी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज माझे आजोबा असते तर त्यांना नक्कीच माझ्याबद्दल अभिमान वाटला असता. - आदित्य ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते

तर मी फासावर सुद्धा जायला तयार आहे : मी माझ्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी जे घटनाबाह्य सरकार मुंबईचे आणि महाराष्ट्राचे नुकसान करत आहे, वाटोळे करत आहे, ते आम्ही होऊ देणार नाही. कारण मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा सुरू आहेत. याबाबत आम्ही राज्यपालांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री चार-चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त असताना, त्यांनी थोडे महाराष्ट्रात ही पाहावं अशी आम्ही राज्यपालांकडे मागणी केली आहे. माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला आहे, पण मी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी फासावर सुद्धा जायला तयार आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हणत, शिंदे गटावर निशाणा साधला.

आम्ही या कृतीचा निषेध करतो : आदित्य ठाकरेंनी पुलाचं उद्घाटन केल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. लोअर परेल पुलाचं काम अर्धवट असताना सुद्धा फक्त श्रेय लाटण्याकरता आमदार आदित्य ठाकरे आणि काही मंडळींनी त्या पुलाचं उद्घाटन करण्याकरता गेले. त्यांनी बेकायदेशीररित्या त्या पुलाचं उद्घाटन केलं. परंतु त्यांनी हा विचार केला नाही की, असं केल्यानं जनतेच्या जीविताला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांचे जगप्रसिद्ध प्रवक्ते संजय राऊत लगेचच जी बोंबाबोंब करत आहेत. ती फक्त आणि फक्त चापलूसी आहे. बाकी काही नाही. त्यांच्या या कृतीचा मी निषेध करतो, असं शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. Aaditya Thackeray : वाढत्या रुग्ण मृत्यू प्रकरणावर आम्हला राजकारण करायचं नाही, पण...- आदित्य ठाकरे
  2. Aditya Thackeray On Hospital : आरोग्य यंत्रणांची पाहणी करण्यासाठी राजकीय नेते सरसावले, मात्र पुढे काय?...आदित्य ठाकरे
  3. Aditya Thackeray : "बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष कसे शोभतात?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.