नालासोपारा (पालघर) - सातीवली येथील इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गोदामात १ एप्रिल रोजी चोरी झाली. १ एप्रिलच्या मध्यरात्री काही चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या गोदामात शटर तोडून प्रवेश करत, लाखो रुपयांचा माल चोरला होता. या गुन्हातील मुख्य आरोपीला वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने गुजरात राज्यातील गोध्रा येथून अटक केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून पंचवीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आदी इंटरप्रायझेस कंपनीचे गोडाऊन फोडले
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सातीवली परिसरातील तुंगारफाटा येथील आदी इंटरप्रायझेस कंपनीचे मोठे गोडाऊन आहे. त्यात १ एप्रिलच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली होती. कर्मचाऱ्यांना गोदामाचे टाळे तोडलेले दिसल्यावर पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती दिली होती. चोरट्यांनी या गोदामातून ४८ लाखांहून अधिक किंमतीच्या विविध कंपन्यांच्या एसी, एलईडी टीव्ही आदी सामान टेम्पो गोदामात लावून चोरले होते. या घटनेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले होते. गुन्ह्यातील टोळीचा म्होरक्या अश्फाक अब्दुल जब्बा ऊर्फ कालिया (वय ३०) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा- देवीच्या मंदिरातील दागिन्यांसह मूर्तींची चोरी; मुद्देमालासह अल्पवीयन त्रिकुट ताब्यात