ETV Bharat / state

MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढ, तत्काळ वॉरंट जारी करण्याचे शिवडी कोर्टाचे निर्देश - Shivdi court directed immediate execution warrant

अमरावतीचे खासदार ( Amravati MP Navneet Rana ) नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ( Navneet Rana problems increase ) आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा यांच्या विरोधात पोलिसांना तत्काल अजामीनपात्र वॉरंट ( Non-bailable warrant issued against Navneet Rana ) जारी करण्याचे निर्देश दिले आहे.

MP Navneet Rana
MP Navneet Rana
author img

By

Published : Oct 20, 2022, 10:08 PM IST

मुंबई- अमरावतीचे खासदार ( Amravati MP Navneet Rana ) नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ( Navneet Rana problems increase ) आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने नवनीत राणा यांच्या विरोधात पोलिसांना तत्काल अजामीनपात्र वॉरंट ( Non-bailable warrant issued against Navneet Rana ) जारी करण्याचे निर्देश दिले आहे. यापूर्वी देखील शिवडी न्यायालयाने जामीन पत्र वॉरंट जारी केला होता. या विरोधात सत्र न्यायालयात राणा यांनी धाव घेतली होती. मात्र न्यायालयात कुठल्याही प्रकारचे वॉरंटला स्थगिती न दिल्याने कारवाई करण्याचे निर्देश शिवडी न्यायालयाने दिले आहे. या याचिकेवर 7 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

मुलुंड पोलीस अटक करण्याची शक्यता - जात पडताळणी प्रकरणांमध्ये मुलुंड पोलिसांनी अजामीनपात्र वॉरंट आणखी मुदत देण्यात यावी, याकरिता शिवडी कोर्टामध्ये अर्ज केला होता. या अर्जावर याचिका करते यांनी आक्षेप घेत असे म्हटले होते की, सत्र न्यायालयाने या अर्जावर कुठलीही संरक्षण तथा निर्णय अद्याप दिला नसताना देखील पोलिसांनी अद्यापही कारवाई केलेली नाही. असे कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून दिले. त्यानंतर शिवडी कोर्टातील न्यायाधीश यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना अजामीनपात्र वॉरंट वर तातडीने कारवाई करण्यात यावी असे निर्देश दिले आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी मुलुंड पोलीस अटक करण्याची शक्यता आहे.

अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळावल्या आरोप - खा.नवनीत राणा यांच्या विरोधात कलम 420, 468, 471, 34 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवनीत आणि हरभजन सिंग रामसिंग कुंडलेशिवाय तिचे वडील देखील या प्रकरणात आरोपी आहे. नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा केल्याचा आरोप आहे. अमरावती मतदार संघ अनुसूचित जाती उमेदवारांसाठी राखीव आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा उर्फ ​​नवनीत कौर हरभजन सिंग कुंडलेस आणि तिचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दोषारोपपत्र दाखल - 2021 मध्ये राणाला मुंबई उच्च न्यायालयाने तिचे प्रमाणपत्र फसव्या पद्धतीने मिळविल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर ते सरेंडर करण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला होता की, अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असलेल्या जागेवर तिला खासदारपदाची निवडणूक लढवता यावी म्हणून फसवणूकीचा दावा करण्यासाठी जातीच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज जाणीवपूर्वक राणाने केला होता. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र दोषारोपपत्र दाखल झालेल्या दंडाधिकारी न्यायालयात कामकाज सुरूच होते.

दरम्यान, यापूर्वी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राणाच्या वकिलाने दाखल केलेले दोन्ही अर्ज फेटाळून लावत अजामीनपात्र वॉरंट जारी केले. न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 22 ऑगस्ट रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर नवनीत राणा आणि तिचे वडील 25 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर झाले. अशा प्रकारे न्यायालयाने वॉरंट रद्द केले प्रत्येकी 200 रुपये दंडाच्या अधीन.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.