मुंबई : बिल्कीस बानो बलात्काराचे दोषी मोकळे फिरत असताना या सर्व राजकारण्यांना मला अटक करायची (BJP Pradesh Mahila Morcha President chitra Wagh) आहे. ही मोठी विडंबना आहे. समाजासाठी मी बलात्काऱ्यांपेक्षा मोठा धोका आहे का ? मला कोणता खटला, वायफळ बडबड नको आहे. तुमची आणि तुमच्या कुटूंबातील सदस्यांची संपत्ती उघड केल्यास मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे. वेळोवेळी तुमच्या पक्षातील अनेक पुरुषांवर छेडछाडीचे आरोप झालेले आहेत. श्रीमती चित्रा वाघ मी तुम्हाला महिलांसाठी काहीही करताना पाहिले नाही, असे उर्फी जावेदने सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले (actress Urfi Javed Criticized chitra wagh) आहे.
उर्फी जावेदचा पलटवार : उर्फी म्हणाली की, 'माझ्या नवीन वर्षाची सुरुवात' एका पोलीस तक्रारीने झाली आहे. या राजकारण्यांना काही काम नाही आहे का? या राजकारण्यांना, वकिलांना कळत नाही का? आपल्या संविधानात असा कोणताच नियम नाही. ज्यानुसार ही लोकं मला जेलमध्ये पाठवू शकतील. माझे निप्पल व व्हजायना जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत मला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. तुम्हाला फक्त मीडियाचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. चित्रा वाघ, मी तुम्हाला आणखी चांगल्या कल्पना देते, तुम्ही सेक्स ट्रॅफिकिंग विरुद्ध काम करा, अवैध डान्स बारवर बंदी आणा, अवैध देहविक्री व्यवसायावर बंदी आणा, या सर्व समस्या मुंबईत आहेत त्यांच्याकडे लक्ष (actress Urfi Javed Criticized) द्या.
चित्रा वाघ यांची मागणी : किळसवाणे अंगप्रदर्शन करणाऱ्या मॉडेल उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई (chitra wagh police complaint) करावी, यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त यांची भेट घेत भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मागणी केली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र देऊन मॉडेल उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी (chitra wagh demand action on urfi javed) केली.
समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय : चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्राद्वारे उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली (Urfi Javed Chitra wagh controversy) नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे ? याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत. याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी (action on actress urfi javed) आहे. दरम्यान, उर्फीने केलेल्या ट्वीटवरून पुन्हा आता काही वाद होणार का? चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे