मुंबई : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईतील जुहू येथील पॉश भागात राहते. समुद्रकिनारी असलेल्या शिल्पा शेट्टीच्या घराला बाहेरील व्यक्ती भेट देऊ शकत नाही. तिच्या घराभोवती 24 तास सुरक्षा असते. त्यानंतरही दोन चोरटे समुद्रातून 25 फूट भींत चढून शिल्पा शेट्टीच्या घरी चोरी केली. त्यानंतर लाखो रुपये चोरून तेथून पळून गेले. जुहू पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 जून रोजी शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीची घटना उघडकीस आली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जुहू पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरातून चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली आहे. अजय उर्फ रमेश उर्फ अजय चित्ता, वय 22 वर्ष, अर्जुन सुरेश बाबू देवेंद्र, वय 26 वर्षे अशी दोन आरोपींची नावे आहेत.
दोघांना अटक : आरोपी अजय चित्ता (वय २२ वर्षे) याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे ४ गुन्हे दाखल आहेत. अर्जुन देवेंद्र (वय २६ वर्षे) याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. या दोघांनाही पोलिसांनी नेहरू नगर विलेपार्ले पश्चिम, मुंबई येथून अटक केली आहे. शिल्पा शेट्टीच्या घरातून चोरी करून दोघेही मुंबई सोडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र ते पळून जाण्यापूर्वीच जुहू पोलिसांनी दोघांना अटक केली. चोरट्यांनी शिल्पा शेट्टीच्या घरातून काय चोरले हे अद्याप समजू शकलेले नाही. शिल्पा शेट्टी सध्या लंडनमध्ये आहे. ती मुंबईत आल्यावरच कळेल, असे जुहू पोलिसांनी सांगितले. शिल्पा शेट्टीच्या घरातील मोठ्या चोरीच्या घटनेची उकल करणारे जुहू पोलिस डिटेक्शन ऑफिसर आणि एपीआय विजय धोत्रे यांनी सांगितले की, आज आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
खिडकीतून बेडरूममध्ये प्रवेश : चोरट्यांनी खिडकीतून बेडरूममध्ये प्रवेश केला विजय धोत्रे यांनी सांगितले की, दुपारी ३.२५ च्या सुमारास हे चोरटे तोंडाला रुमाल बांधून शिल्पा शेट्टी यांच्या घरात घुसले. त्यांचा मास्टर बेडरूम हॉल, डायनिंग टेबल, वॉर्डरोब, बेडरुमचे फर्निचर, कपाट असे सर्व दरवाजे उघडून चोरी केली. चोरट्यांनी खिडकीतून शिल्पा शेट्टीच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. ही कारवाई जुहू पोलीस तपास अधिकारी एपीआय विजय धोत्रे, अमित महांगडे, नितीन मांडेकर, सुहास भोसले, प्रकाश तासगावकर, पोलीस कॉन्स्टेबल बनकर यांनी ही कारवाई केली. दोन्ही चोरट्यांना अटक करण्यात आली.