ETV Bharat / state

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्यात अडथळा कायम, दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येच्या तपासासंदर्भात सीबीआयनं जारी केलेल्या लूकआउट नोटीसला रिया चक्रवर्तीनं उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र या नोटीसला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिलाय.

Rhea Chakraborty
रिया चक्रवर्ती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 16, 2023, 7:55 AM IST

मुंबई Rhea Chakraborty : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीनं रिया चक्रवर्तीवर ड्रग्स प्रकरणात गुन्हा नोंदवून खटला चालवला होता. त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती श्यामचांड यांच्या खंडपीठात शुक्रवारी सुनावणी झाली. यात सीबीआयच्या लूक आऊट नोटीसला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला. यामुळं रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला नसून तिला अद्यापही परदेशात जाण्यास अडथळा कायम आहे.

रिया चक्रवर्तीला दिलासा नाहीच : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती आरोपी आहे. तिचा भाऊ देखील या प्रकरणात संशयित आरोपी आहे. त्यासंदर्भातला तपास सुरु आहे. मात्र शौक चक्रवर्तीला ऑस्ट्रेलियाला कार्यक्रमासाठी जायचं होतं. त्याला त्यावेळी न्यायालयानं दिलासा दिला होता. परदेशात जाण्यासाठी रिया चक्रवर्ती विरोधातील लूक आउट सर्क्युलरला स्थगिती देण्याची मागणी रियाकडून केली होती. तिला केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो यांनी विरोध केला. त्यामुळं न्यायालयानं त्याच्यावर निर्णय केलाच नाही. परिणामी तिला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर 2020 मध्ये नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोनं ड्रग्स प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावावर देखील गुन्हा नोंदवून खटला चालवलेला आहे.

सीबीआयच्या लुक आउट नोटीसला स्थगिती मिळावी : रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ या दोघांना आपल्या व्यवसाय कामाच्या निमित्तानं देशाच्या बाहेर जावं लागतं. दरम्यान सीबीआयकडून दोघांच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केली गेली होती. या लूक आउट नोटीसवर स्थगिती मिळवण्यासाठी रिया चक्रवर्तीनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सीबीआयनं रिया चक्रवर्तीच्या अर्जास विरोध केलाय.

तीन वर्षांपूर्वी लूक आउट परिपत्रक जारी : शुक्रवारच्या सुनावणीत रिया चक्रवर्तीचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती ए एस गडकरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाला सांगितलं, की सीबीआयनं या प्रकरणात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून आणि लूकआउट परिपत्रक जारी करुन तीन वर्षे झाली आहेत. मात्र, आजतागायत या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही. अभिनेत्रीच्या वकिलानं असंही सांगितलं, की सीबीआयनं रिया चक्रवर्तीला कधीही समन्स बजावलं नाही आणि आरोपपत्रही दाखल केलं नाही.

याचिकेला उत्तर देताना सीबीआयनं प्रतिज्ञापत्र केलं दाखल : सीबीआयचे वकील श्रीराम शिरसाट यांनी या प्रकरणात सांगितलं की, एजन्सीनं याचिकेला उत्तर म्हणून प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. रिया चक्रवर्ती याआधी परदेशात गेली होती का, हे या वेळी खंडपीठाला जाणून घ्यायचं होतं. चंद्रचूड म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर चक्रवर्तीला विशेष एनडीपीएस न्यायालयाकडून परदेशात जाण्याची परवानगी मिळाली होती. मात्र सीबीआयच्या लूकआउट सर्क्युलरमुळे ही अभिनेत्री परदेशात जाऊ शकली नाही.

हेही वाचा :

  1. Rhea Chakraborty : सुशांत सिंह राजपूतनंतर रिया चक्रवर्ती बंटी सजदेहसोबत डेट करतेय? वाचा सविस्तर
  2. जेलमधून सुटताना रिया चक्रवर्तीने केला होता डान्स, वाटली होती मिठाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.