मुंबई : लंडनमधील शूटिंग लोकेशनसाठी वापरण्याच्या बहाण्याने मोहन नाडरने दिपककडून पैसे घेतले, ते अद्याप परत केलेले नाहीत, असे अभिनेता दीपक तिजोरी याने आंबोली पोलिसांना सांगितले. दीपक तिजोरी याने सहनिर्माते मोहन नाडरवर चित्रपटाच्या लोकेशनच्या नावावर फसवणूक केल्याचा आरोप केला. 15 मार्चला मुंबईतील आंबोली पोलिस स्टेशनमध्ये सहनिर्माते मोहन नाडर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जो त्यांच्यासोबत थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी एकत्र आला होता. आंबोली पोलिसांनी अभिनेता दीपक तिजोरी यांच्या तक्रारीवरून ते दंड संविधान कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आंबोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
टिप्सी नावाच्या चित्रपटासाठी करार : आंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता दीपक तिजोरी आणि मोहन नाडर यांनी 2019 मध्ये टिप्सी नावाच्या चित्रपटासाठी करार केला होता. त्यावेळी सहनिर्माते मोहन नाडरने अभिनेत्याकडून पैसे घेतले होते, ते परत मागितल्यावर त्याने अभिनेत्याला एकापाठोपाठ एक असे अनेक धनादेश दिले, परंतु ते बाऊन्स झाले. अभिनेत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक तिजोरी यांनी दिलेले पैसे मोहन नाडरने अद्याप परत केलेले नाहीत.
अभिनेत्याच्या तक्रारीची चौकशी : दरम्यान, पोलिस अभिनेत्याच्या तक्रारीची चौकशी करत आहेत. 2019 मध्ये टिप्सी या चित्रपटाचा करार केल्यानंतर लंडनमधील लोकेशनच्या बहानाने सहनिर्माते मोहन नाडर यांनी अभिनेता दीपक तिजोरी याच्याकडून दोन कोटी साठ लाख रुपये घेतले होते. मात्र नंतर दीपक तिजोरी यांनी दिलेले पैसे परत मागितल्यानंतर नाटक यांनी अनेक धनादेश दीपक तिजोरी यांना दिले. मात्र, ते एका मागोमाग एक बाऊन्स झाले. त्यानंतर अभिनेता दीपक तिजोरी यांनी अंधेरीतील आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्या प्रकरणाचा आंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत.