ETV Bharat / state

Actor Ashok Shinde : ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांना 'नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती' पुरस्कार प्रदान!

मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे (actor Ashok Shinde) यांना नुकताच 'नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती' पुरस्कार (Natshrestha Nilu Phule Smriti award) प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशनतर्फे ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृति पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येते.

Actor Ashok Shinde
अभिनेते अशोक शिंदे
author img

By

Published : Jan 8, 2023, 5:34 PM IST

मुंबई : मराठी सिनेनाटयसृष्टीत चिरतरुणअभिनेता म्हणून अशोक शिंदे यांची (actor Ashok Shinde) ओळख आहे. नाटक, चित्रपट, मालिकांमधून नायक, सहनायक तसेच खलनायक अशा विविधांगी भूमिका त्यांनी आजवर साकारल्या. आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याच्या कारकिर्दीचा सन्मान करत यंदाचा ‘नटश्रेष्ठ निळू फुले स्मृति’ पुरस्कार (Natshrestha Nilu Phule Smriti award) त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कर्त्यांची निवड डाॅ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav), पद्मश्री डाॅ. प्रकाश आमटे (Padmashri Dr. Prakash Amte), तात्या बाेराटे (Tatya Borate), मकबुल तांबाेळी (Makbul Tamboli) आदी समितीतील सदस्यांनी केली. २०१० पासून ही संस्था उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कृत करीत आहे. नाट्य, चित्रपट दिग्दर्शन कार्यशाळा यांचेही दरवर्षी आयाेजन करीत आहे. आजपर्यंत १२५ मान्यवर विभुतींना पुरस्कृत केले आहे.

साकारलेल्या भूमिकांनी रसिकांना आनंद दिला : 'एका पेक्षा एक', 'रंगत संगत', 'हमाल दे धमाल', 'एवढंस आभाळ', 'लालबागची राणी', 'रॉकी', 'विजय दीनानाथचौहान', 'हर हर महादेव' आणि यासारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत त्यांनी आपली लोकप्रियता जपली. मालिका विश्वातही अशोक शिंदे यांनी स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 'घरकुल', 'दामिनी', 'अवंतिका', 'स्वप्नांच्या पलीक'डे, 'दुहेरी', 'वसुधा', 'छत्रीवाली' आणि सध्या गाजत असलेली 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' यांसारख्या अनेक मालिकांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रेम प्रेम असतं', 'अपराध मीच केला', 'षडयंत्र', ‘ब्लाइंड गेम’ अशा विविध जॉनरच्या नाटकांमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी रसिकांना आनंद दिला. अशोक शिंदे यांनी आजवर नायक आणि सहनायकासह खलनायकाची व्यक्तिरेखाही साकारली आहे.

'ही' माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे : अशोक शिंदे यांनी आजवर २२५ चित्रपट, १५० मालिका, ५० पेक्षा जास्त नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर पाडली आहे. या पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अशोकजी म्हणाले, ‘नटश्रेष्ठ निळू फुले या महान कलाकाराच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट (It is an honor for me) आहे. या अशा पुरस्करांमुळे काम करायला बळ मिळते. माझा होत असलेला हा सन्मान खरंच माझ्यासाठी आनंददायी आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) शेतकरी सदन सभागृहामध्ये आज जानेवारीला शिंदे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.