ETV Bharat / state

'लॉकडाऊन'च्या काळात 38 हजारांहून अधिक जणांवर कारवाई, क्वारंटाईन मोडणाऱ्या 497वर गुन्हे दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमी राज्यात टाळेबंदी लागू आहे. या काळात 22 मार्च ते आजपर्यंत (दि. 12 एप्रिल) संपूर्ण राज्यात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 38 हजार 647 कारवाई करण्यात आली असून क्वारंटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 497 जणांवर राज्यभरात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 12, 2020, 6:42 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत असून देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता लॉकडाऊनचा कार्यकाळ हा 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यभर कलम 144 लागू असून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. 22 मार्च ते आजपर्यंत (दि. 12 एप्रिल) संपूर्ण राज्यात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 38 हजार 647 कारवाई करण्यात आली असून क्वारंटाईनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 497 जणांवर राज्यभरात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 72 घटना आत्तापर्यंतन घडल्या असून या गुन्ह्यात 161 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोनाच्या संदर्भात 63 हजार 829 फोन 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले असून अनधिकृत वाहतुकीचे 820 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 2 हजार 968 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तब्बल 23 हजार 554 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 1 कोटी 34 लाख 49 हजारांचा दंड थोटावला आहे.

फॉरेनर कायद्या अंतर्गत मुंबईत 32, अहमदनगर 29, अमरावती 18, पुणे व नागपूर शहरात प्रत्येकी 8, ठाणे 21, चंद्रपूर 11, गडचिरोली 9, नवी मुंबई 10 व नांदेड 10 अशा परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघन प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात कलम 144 व 188 नुसार पुणे शहरातून सर्वाधिक 4 हजार 915 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 3 हजार 107, नागपूर शहर 2 हजार 419, नाशिक शहर 2 हजार 606, सोलापूर 3 हजार 181, अहमदनगर 3 हजार 640, गुन्हे नोंदविण्यात आले तर सर्वाधिक कमी रत्नागिरी 50, अकोला 51, असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

हेही वाचा - Lockdown: ऑनलाईन-दारूची डिलिव्हरी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.