मुंबई - जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर संशयीतरित्या फिरणाऱ्या इफियुचुकू पीयूस या नायजेरियन व्यक्तीला एनसीबीने ताब्यात घेतले होते. ताब्यात घेताच त्याने स्वतःजवळ असलेल्या 12 कोकेनच्या गोळ्या गिळल्या होत्या.
प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम कोकेन असल्याने 12 ग्रॅम कोकेन त्याने गिळले होते. त्यामुळे पथकाने तत्काळ जेजे रुग्णालय संबंधितास नेले होते. त्यानंतर एक्स-रे व सिटीस्कॅन करण्यासाठी करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तस्कराने तब्बल 12 कोकेनच्या गोळ्या गिळल्या असल्याचे समोर आले. वैद्यकीय उपचारानंतर 18 जानेवारी रोजी या आरोपीला रुग्णालयातून सोडण्यात आले.
हेही वाचा - 'गोस्वामी टोळीने राष्ट्रीय सुरक्षेचे धिंडवडे काढून भाजपचे तोंड काळे केले'