ETV Bharat / state

होमिओपॅथी डॉक्टरला तरुणांनी फेकले धावत्या रेल्वेबाहेर, २ आरोपी गजाआड - Mumbai

परराज्यातून मुंबईत आपल्या मुलासाठी स्थळ पाहण्यासाठी आलेल्या एका होमिओपॅथी डॉक्टरला चालत्या रेल्वेबाहेर फेकून दिल्याने त्याच्यावर डावा पाय गमवायची वेळ आली आहे.

होमिओपॅथी डॉक्टरला ३ आरोपींनी फेकले रेल्वेबाहेर
author img

By

Published : Apr 3, 2019, 7:21 PM IST

मुंबई - परराज्यातून मुंबईत आपल्या मुलासाठी स्थळ पाहण्यासाठी आलेल्या एका होमिओपॅथी डॉक्टरला चालत्या रेल्वेबाहेर फेकून दिल्याने त्याच्यावर डावा पाय गमवायची वेळ आली आहे. वडाळा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करत २ आरोपींना अटक केली आहे. या संदर्भात एका आरोपीचा शोध सुरू आहे.

रेल्वेतून मोबाइल चोरांनी ढकलून दिल्यानंतर सदरची पीडित व्यक्ती डॉ. अख्तर अली खान बराच वेळ रेल्वे रुळावर रक्ताच्या थारोळ्यात पडून इतर प्रवाशांना डॉक्टरकडे नेण्याची विनंती करत होते. मात्र, बघ्याची भूमिका घेतलेल्या प्रवाशांनी केवळ मोबाईलवर व्हिडिओ केले. परंतु त्यांना रुग्णालयात नेले नाही.

वडाळा पोलिसांनी पीडित अख्तर अली खान यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. त्यावेळी हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी फरहान मोहमद नसीम खान (२१) याने त्याच्या २ साथीदारांसह केल्याचे उघड झाले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरपीएफ पोलिसांच्या मदतीने तपास करत पोलिसांनी मुख्य आरोपी फरहानसह एकाला अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

दरम्यान, २९ मार्च रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनच्या दरवाजावर उभे राहून अख्तर खान हे मोबाईलवर बोलत असताना ३ आरोपींनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत मुख्य आरोपी फरहान याने पीडितेला चालत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले. त्यामुळे अख्तर खान यांच्या पायाला दुखापत होऊन त्यांचा डावा पाय डॉक्टरांना कापावा लागला.

Intro:परराज्यातून मुंबईत आपल्या मुलासाठी स्थळ पाहण्यासाठी आलेल्या एका होमीपॅथी डॉक्टरला चालत्या रेल्वेबाहेर फेकून दिल्याने डावा पाय गमवायची वेळ आली आहे. वडाळा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करीत दोन आरोपीना अटक केली असून या संदर्भात एका आरोपीचा शोध सुरू आहे. रेल्वेतून मोबाइल चोरांनी ढकलून दिल्यानंतर सदर ची पीडित व्यक्ती डॉ अख्तर अली खान बराच वेळ रेल्वे रुळावर रक्ताच्या थारोळ्यात पडून इतर प्रवाशांना डॉक्टर कडे नेण्याची विनंती करीत होते मात्र बघ्याची भूमीका घेतलेल्या प्रवाशांनी केवळ मोबाईल फोन वर व्हिडीओ काढले होते.
Body:वडाळा पोलिसांनी पीडित अख्तर अली खान याना रुग्णालयात दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवित तपास सुरू केला असता हा गुन्हा रेकॉर्ड वरील आरोपी फरहान मोहमद नसीम खान (21) याने त्याच्या दोन साथीदारांसह केल्याचे उघड झाले. सीसीटीविच्या माध्यमातून आरपीएफ पोलिसांच्या मदतीने तपास करीत पोलिसांनी मुख्य आरोपी फरहान सह दोन आरोपीना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
Conclusion:दरम्यान 29 मार्च रोजी दुपारी 1.30 च्या दरम्यान रे रोड रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेन च्या दरवाजावर उभे राहून अख्तर खान हे मोबाईलवर बोलत असताना तीन आरोपीनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकविण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत मुख्य आरोपी फरहान याने पीडितला चालत्या ट्रेन बाहेर ढकलून दिले ज्यामुळे अख्तर खान यांच्या पायाला दुखापत होऊन त्यांचा डावा पाय डॉक्टरांना कापावा लागला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.