मुंबई - शहरातील विनोबा भावे नगर परिसरात एका 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
गेल्या 14 ऑगस्टला मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे राहणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीला आरोपीने तिचे आईवडील घाटकोपर येथील चौकात गेल्याचे सांगितले होते. तिला सोबत घेऊन तो घाटकोपर परिसरातील एलबीएस मार्गावरील झोपडीत आणून डांबले होते. त्यानंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने खबरी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला आणि काही तासातच अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच अल्पवायीन आरोपीला अटक केली आहे. अटक अल्पवयीन आरोपी हा व्यसनी असून मुंबईतील शिवाजी नगर , देवनार पोलीस ठाण्यात त्यावर गुन्हे दाखल आहेत.
अटक केलेला आरोपी यापूर्वी देखील गेली दीड वर्ष अपहरण आणि सामूहीक बलात्काराच्या गुन्ह्यात बालसुधार गृहात होता. नुकताच जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्यांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.