ETV Bharat / state

विलेपार्ले परिसरात 5 घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक

author img

By

Published : Oct 15, 2020, 12:03 PM IST

विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात पाच घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 50 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हा चोरीला गेला होता.

Villeparle burglary accused arrested
विलेपार्ले घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई- विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात पाच घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 50 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हा चोरीला गेला होता. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अतिश साखरकर (31) या 43 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक केली आहे.

रात्रीच्या वेळेस इमारतीच्या खिडकीचे लोखंडी ग्रील कापून घरफोडीच्या घटना समोर आल्या. रोख रक्कम व सोन्याचे दागिने आरोपींनी पळविले. ह्या घटना वारंवार घडत असल्याने यासंदर्भात विलेपार्ले पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू झाला. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी डोक्यावर कॅप घालून चोरी करताना पोलिसांना आढळून आला. मात्र डोक्यावर कॅप घातल्यामुळे या आरोपीची ओळख पटत नव्हती.

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोनचा तांत्रिक अभ्यास करून अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण व पालघर याठिकाणी घरफोडीचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांचा अभिलेख पडताळून पाहिला. यामध्ये पोलिसांना एका आरोपीची ओळख पटली. अतीश दत्ताराम साखरकर या आरोपीवर घरफोडी, चेन स्नेचिंग, बलात्कारासारखे एकूण 43 गुन्हे दाखल असल्याची पडताळणी झाली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

अतीश दत्ताराम साखरकर या आरोपीचं राहण्याचे ठिकाण पोलिसांना कळल्यानंतर त्यांनी सावेवाडी या ठिकाणी जाऊन आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा आरोपी मोटरसायकलवरून जवळच्या जंगलामध्ये पळून गेला. मात्र पोलिसांनी जंगलामध्ये जाऊन या आरोपीला अटक केली. आरोपीची सध्या न्यायालयाने पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा...

जळगावात भरदिवसा घरफोडी; दागिन्यांसह रोकड लंपास

LIVE : मुसळधार पावसानंतर मुंबई-पुण्यासह राज्यातील परिस्थिती

Top 10 @ 9 AM : सकाळी नऊच्या ठळक बातम्या!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.