मुंबई : फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानिया यांनी अमृता फडणवीस यांच्याशी आधी ओळख वाढवली. त्यांना फसवण्याच्या उद्देशाने एक कोटी रुपयांचे अमिष देण्याचा प्रकार केला. याबाबत अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत संवाद साधला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशिष्ट पद्धतीची रचना केली. अखेर आरोपी अनिक्षा जयसिंगानिया अमृता फडणवीस यांना लाच देऊन एका प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले.
सापळा रचून आरोपीला पकडले : तब्बल दीड वर्षापासून अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क ठेवून असलेली अनिक्षा जयसिंघानिया हिने हा सगळा प्रकार केला आहे. आरोपी असलेल्या अनिक्षा जयसिंगानिया हिने फेब्रुवारी महिन्यामध्ये अमृता फडणवीस यांना संपर्क केला. संपर्क केल्यावर फोनवरून अनिक्षाने अमृता फडणवीस यांना सांगितले की, तिच्या वडिलांचे एका प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलेले आहे. यातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, अनिक्षाचे हे वाक्य ऐकताच अमृता फडणवीस यांनी फोन बंद केला. तिचा नंबर देखील ब्लॉक केला. यानंतर पोलिसांमध्ये त्यांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बरोबर पकडण्याचा प्रयत्न केला.
व्हाईटस नोट्स आणि संदेश : आरोपी असलेल्या अनिक्षाकडून 18 फेब्रुवारी रोजी व्हाट्सअपवरून विविध प्रकारचे व्हाईटस नोट्स आणि संदेश देखील आल्याचे अमृता फडणवीस यांनी पोलिसांचेकडे गुन्हा नोंदणी करताना सांगितलेल आहे. उपमुख्यमंत्री यांच्या पत्नीलाच अडकवण्याचा हा प्रकार असल्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये खुद्द स्वतः याबाबत माहिती दिली. या संदर्भातला तपास सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी : दरम्यान अमृता फडणवीस यांनी नमूद केले की, त्या आरोपी असलेल्या अनिक्षा हिने असे सांगितले की, माझ्या आईचा मृत्यू झाला आहे. माझ्या कुटुंबाचा खर्च हा मी करते. माझा व्यवसाय हा डिझाईनिंगचा आहे. त्यामुळे मी डिझाईनिंग केलेले कपडे, दागिने जर सार्वजनिक कार्यक्रममध्ये तुम्ही घातले तर ते ब्रँड म्हणून ओळखले जातील. अशाप्रकारे खोटी सहानुभूते मिळवण्याचा प्रकार केल्याचा त्यांनी अधोरेखित केले. आता आरोपी अनिक्षा जयसिंघानीला आज मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर केले होते. तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.