मुंबई - सहा महिन्यानंतरही जगभरातील कोरोनाची दहशत काही संपताना दिसत नाही. अमेरिका, भारत, ब्राझीलसारख्या देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे ते कोरोनावरील लस कधी येणार याकडे. अनेक ठिकाणी कोरोना लसीची मानवी ट्रायल सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार महिन्यात लस येईल अशी आशा अनेक जण बाळगून आहेत. पण कोरोनाची लस 2020 मध्ये नव्हे तर 2021 मध्येच येईल असे तज्ज्ञांनकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अजून पुढचे काही महिने आपल्याला मास्क, सॅनिटायझर्सचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग आणि घरातच राहणे या सर्व शस्त्रांचा वापर करतच कोरोनाला दूर ठेवावे लागणार असल्याचे ही तज्ज्ञ सांगत आहेत.
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना संसर्गाने आता जगाच्या नाकी नऊ आणले आहेत. लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली असून, हजारो रूग्ण दगावले आहेत. त्यात अजूनही कोरोनावर रामबाण उपाय सापडलेला नाही. तर आता कोरोनाला हरवण्यासाठी लसच गरजेची आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार सुरूवातीपासूनच भारतासह जगभरातील फार्मा कंपन्या आणि शास्त्रज्ञ लस बनवण्याच्या मागे लागले आहेत. आजच्या घडीला जगभरात 23 लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. त्यातही यात ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठ आघाडीवर आहे. ऑक्सफर्डकडून सर्वांत आधी लस उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे. असे झाले तर त्याचा फायदा भारतालाही होणार आहे. कारण ऑक्सफर्डच्या लशीच्या उत्पादनात भारतातील, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट महत्वाची भूमिका बजावत असून 50 टक्के उत्पादन हे भारतासाठी असणार आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या 3 ते 4 महिन्यात लस येईल, असे म्हटले जात असून त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण तज्ज्ञांच्या मते मात्र लस यायला सहा महिन्यापेक्षा जास्त काळ लागेल असे सांगत आहेत. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी ही लस येण्यासाठी आणि ती भारतीयांना उपलब्ध होण्यासाठी आणखी बराच वेळ वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे 2020 मध्ये लस येणे शक्य नसून, नव्या वर्षातच लस येईल असेही ते म्हणाले. जगभरात लसीची चाचणी सुरू आहे. ही चाचणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष लस कधी येणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पण एक नक्की की लस उपलब्ध होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याचे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले आहे. तर आता मुंबईसारख्या शहरात कोरोनाचा कहर थोडा कमी झाला आहे. असे असले तरी लस येईपर्यंत सर्वांना आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसारखे सर्व नियम आपल्याला कटाक्षाने पाळावेच लागतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
'2021 मध्येच येणार कोरोनावरची लस, तोपर्यंत मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग हेच शस्त्र' - कोरोना लस न्यूज
अनेक ठिकाणी कोरोना लसीची मानवी ट्रायल सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या तीन-चार महिन्यात लस येईल अशी आशा अनेक जण बाळगून आहेत. पण कोरोनाची लस 2020 मध्ये नव्हे तर 2021 मध्येच येईल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.