ETV Bharat / state

'हिंदुत्व स्वीकारल खरं, पण मनसेने अमराठींना अद्याप जवळ केले नाही' - देवेंद्र फडणवीस मनसे अमराठी विरोधी भूमिका मत

बुधवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मनसेच्या अमराठी भूमिकेबाबत आपले मत स्पष्ट केले. मनसे आणि भाजपमध्ये विचारसरणीचा मूलभूत फरक असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 11, 2021, 8:44 AM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)ने हिंदुत्व स्वीकारले आहे. मात्र, भाजपची मराठी भाषिकांबरोबरच अमराठी भाषिकांबाबतची भूमिका त्यांनी स्वीकारलेली नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे राज्यात भाजप आणि मनसेमधील नव्या युतीची नांदी होईल, या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.

आगामी काळात राज्यात विविध प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांची प्रतीक्षा सर्वच राजकीय पक्षांना आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या या महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व असून ही पालिका काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी भाजप येत्या काळात मनसेसोबत युती करू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. मनसे आणि भाजपकडून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही समोर आले आहे.

दोन्ही पक्षांच्या विचारांमध्ये मूलभूत फरक -

देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा केली असता, मनसेने हिंदुत्व स्वीकारले आहे. परंतु, मराठी भाषिकांना न्याय देताना, अमराठी भाषिकांवर अन्याय होता कामा नये. आमच्या दोघांतील विचारांमध्ये हा मुलभूत फरक आहे. मराठी भाषिकांना न्याय द्यायला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. परंतु, मराठी भाषिकांना न्याय देताना, अमराठी भाषिकांवर अन्याय करणे, ही बाब भाजपला मान्य नाही. मराठी भाषिकांबरोबरच इतर भाषिकांबाबतही न्यायचं व्हायला हवा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. ही भूमिका मनसेने अद्याप स्वीकारलेली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.