मुंबई - द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी १३ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या खटल्यात समाजवादी पार्टीचे नेते अबू आसिम आझमी यांची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या रेकॉर्डिंगच्या सीडींपैकी एक रिकामी निघाली आणि एक सीडी न्यायालयातील लॅपटॉपमध्ये चालवता आली नाही. त्याचबरोबर एक कॅसेट चालवण्यासाठी काही साधनच नव्हते. शिवाय पोलिसांना गुन्हाही सिद्ध करता आला नाही. त्यामुळे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आझमी यांना त्यांच्याविरोधातील आरोपातून निर्दोष मुक्त केले.
पोलिसांनी सादर केलेल्या सीडी आणि कॅसेट पाहून 13 वर्षानंतर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी यांना भडकावल्याच्या भाषणाच्या आरोपातून माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष सोडले. शिवाजी पार्कवर हिंदीमध्ये भडकाऊ भाषण करून मराठी आणि उत्तर भारतीयांमध्ये वैमनस्य आणि द्वेष पसरवल्याचा आरोप आझमींवर होता. खटल्याच्या कालावधीत न्यायालयाने फिर्यादींचा दावाही फेटाळला. ज्यामध्ये असे म्हटले होते, की 'आरोपीच्या भाषणामुळे राष्ट्रीय एकता आणि अखंडतेवर परिणाम झाला आहे'. आझमी यांच्या कथित दाहक भाषणासंदर्भात चार सीडी दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केल्या. त्यातील एक रिकामी होती. दंडाधिकाऱ्यांच्या लॅपटॉपमध्ये दोन सीडी सुरू झाल्या नाहीत. एका सीडीमध्ये इंग्रजी वृत्तवाहिनीची एक क्लिप होती. याशिवाय कॅसेट चालविण्यासाठी उपकरणे उपलब्ध नव्हती. भाषण राज ठाकरे यांच्याविरूद्ध होते. महाराष्ट्राचा विरुद्ध नाही, हे पाहताच दंडाधिकारी यांनी सांगितले की आरोपींच्या भाषणाची सीडी प्रत्यक्षात 3 फेब्रुवारी 2008 रोजी दादरमध्ये नोंदविण्यात आली होती की नाही याबद्दल शंका निर्माण होते. हे पाहता न्यायालयाने अबू आझमी यांना दोषमुक्त केले.